Nashik News : नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटन, रोजगार निर्मिती, सेवा क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न विविध विकास कामाच्या माध्यमातून होत आहेत. या कामांना येत्या काळात अधिक गती देण्यात येईल, असे प्रतिपादन जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले. .नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय येथे देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार नितीन पवार, विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटीलमनपा उपायुक्त करिष्मा नायर आदींची उपस्थिती होती..Nashik Development : नाशिकच्या विकासात उद्योगांचे योगदान महत्त्वपूर्ण .श्री. महाजन म्हणाले, की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. शंभर दिवसांच्या उपक्रमात विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयाने सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने प्रभावी अंमलबजावणी केली. उत्कृष्ट ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा चार स्तरांवर प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षापासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. .सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. याशिवाय, पाण्याचे महत्त्व लक्षात घेता, नारपार-गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाने ७ हजार ६४५ कोटी मंजूर केले आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, उत्तर नाशिक आणि लगतच्या जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमध्ये अधिक जमीन लागवडीखाली येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा यासाठी मुदत ३०ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. .Nashik Development : नाशिक जिल्ह्याचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार करा .जिल्ह्यातील ४ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता वितरणासाठी ८८.६६ कोटी रुपये वितरित झाले आहेत. याबरोबरच खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांना दिले असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. .आगामी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बि-बियाणे, रासायनिक खते वेळेत उपलब्ध होतील याचे नियोजन करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. ॲग्रीस्टॅक म्हणजेच फार्मर आयडीसाठी प्रत्येक शेतकऱ्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन त्यांनी केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.