Kumbh Festival: गोदावरीच्या पवित्र तीरावर वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि संत-महंतांच्या साक्षीने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाची ध्वजवंदनाने मंगलमय सुरुवात झाली. शनिवारी (ता. ३१) रामतीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते भगव्या धर्मध्वजेचे ध्वजवंदन करण्यात आले..बारा वर्षांनंतर येणाऱ्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या स्वागतासाठी झालेल्या या सोहळ्यामुळे नाशिक व त्र्यंबक नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ध्वजवंदनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,.20th Bhimthadi Jatra: पुण्यात १६ डिसेंबरपासून २० वी भीमथडी जत्रा.केंद्रीय आयुष तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, मंत्री जयकुमार रावल, मंत्री संजय सावकारे,.Loan Waiver Scheme : देवळाली प्रवरा शाखेचे ६६० शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित.मंत्री नरहरी झिरवाळ, मंत्री नितेश राणे, महापौर हिमगौरी आडके-आहेर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, खासदार डॉ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते. याशिवाय या पवित्र सोहळ्याला विविध आखाड्यांचे महंत, धर्माचार्य आणि साधू-संत उपस्थित होते..दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तीर्थराज कुशावर्तावर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्यासह संत-महंतांची प्रमुख उपस्थिती होती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.