Nashik Ring Road Project: नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेरील रिंगरोडची भूसंपादन प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शनिवारी (ता.२) मातोरी आणि मुंगसारे या गावांमध्ये जमिनीची मोजणी करण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि महिलांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता यांनी महिलांना मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. .स्थानिक शेतकऱ्यांनी माहिती देताना सांगितले, की मोजणीसाठी सकाळी ९.३० ची वेळ दिलेली असताना, उपविभागीय अधिकारी पवन दत्ता आणि पोलिस ताफा सकाळी ६:३० वाजताच गावात धडकला. शेतकरी गाफील असताना अधिकारी थेट घरांमध्ये घुसले. या वेळी झालेल्या झटापटीत ८० वर्षीय आजी कमळाबाई खिरखाडे यांना गंभीर दुखापत झाली आहे..Land Acquisition Dispute: दमदाटी करून जमिनी का घेता?.शेतकरी अक्षय कातड म्हणाले, ‘‘माझ्या पत्नीला रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले, त्यामुळे शरीरावर नखांचे ओरखडे उमटले. हा प्रकार एखादा अधिकारी करतो का?’’ या वेळी प्रशासनाने दांडगाई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर पुरावे नष्ट करण्यासाठी चित्रीकरण केलेले काही मोबाइल अधिकाऱ्यांनी फोडले आणि व्हिडिओग्राफरलाही ताब्यात घेतले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांचे तत्काळ निलंबन करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे..Office Assets Seized: अकलूज प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त.सहा वेळा नोटीस देऊनही कामात अडथळा आणला जात असल्याने ही कारवाई करण्यात आली. गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा लवकर ही प्रक्रिया राबविण्यात आली. दरम्यान, शेतकरी किंवा महिलांना मारहाण झाल्याचे आरोप चुकीचे आहेत. बहुतांश गावांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे, मात्र तीन-चार व्यक्ती जाणीवपूर्वक इतर शेतकऱ्यांवर दबाव टाकून कामात व्यत्यय आणत आहेत.- पवन दत्ता, उपविभागीय अधिकारी-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर.शासनाला विकासासाठी जमिनी हव्या असतील तर त्यांनी आधी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना न्याय्य मोबदला द्यावा. बळजबरीने लाठीचार्ज आणि दडपशाही करून जमीन संपादन करणे हा मार्ग लोकशाहीला सुसंगत नाही.- करण गायकर, अध्यक्ष, छावा क्रांतिवीर सेना.‘समजुतीने मोजणी’ असे सांगून महिलांना झालेली मारहाण म्हणजे अधिकाराचा गैरवापर आहे. विकास हवा आहे, पण शेतकऱ्यांचा सन्मान विकून नव्हे. प्रशासनाने ही दडपशाही त्वरित थांबवावी, अन्यथा चार मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल.- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.