Land Acquisition Issues: प्रस्तावित रिंग रोडमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन सोमवारी (ता. २०) तात्पुरते स्थगित करण्यात आले. .कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीचे आश्वासन दिले..Farmers Protest: भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराविरोधात शेतकऱ्यांचा दिल्लीकडे मोर्चा; हरियाणा सीमेवर पोलिसांनी रोखले.सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या रिंग रोडच्या अलाइनमेंटमध्ये (मार्गिकेत) बदल करावा आणि जमीन अधिग्रहणाचा योग्य मोबदला मिळावा, या मुख्य मागण्यांसाठी बाधित शेतकरी गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करत होते..Farmers Protest: कृषिमंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन.सोमवारी सायंकाळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. मात्र, “मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष बैठक झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यानंतर महाजन यांनी आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली..या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मंत्री महाजन यांच्या हस्ते करण गायकर, गोकुळ लांबे आणि ज्ञानेश्वर वेगळे यांना फळाचा रस पाजून आंदोलनाची सांगता करण्यात आली. दरम्यान, यापूर्वी दिवसभर शेतकऱ्यांनी काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध नोंदवला होता..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.