Nashik News : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पश्चिम पट्ट्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात आला होता. मात्र सोमवारी (ता. ८) पावसाचा जोर कमी झाल्याने पुन्हा विसर्ग कमी करण्यात आला आहे. दारणामधून ४,६०० तर गंगापूरमधून २,४५७ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. .त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या तालुक्यांत पावसाची संततधार घाटमाथ्यावर सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत होती. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून धरणातून विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आला. .Ujani Dam Water Discharge : उजनीतून भीमेतील विसर्ग घटवला; पंढरपुरातील पूरस्थिती नियंत्रणात.रविवारी (ता. ७) पावसाचा जोर वाढल्यानंतर गंगापूर धरणातून दुपारी ३ वाजता ९९० क्युसेकने वाढ करून ३०२० क्युसेक करण्यात आला होता. तो सोमवारी (ता. ८) दुपारी १२ वाजता ५६३ क्युसेकने कमी करून २,४५७ क्युसेक गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे..Dam Water Storage: देशातील धरणांमध्ये ८६ टक्के पाणीसाठा; सप्टेंबरमध्येही चांगल्या पावसाचा अंदाज.इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून रविवारी (ता. ७) ४,६०० क्युसेक विसर्ग सुरू असताना त्यात रविवारी दुपारी १२ वाजता १,६०० क्युसेकने वाढ करून ६,२०० इतका सुरू करण्यात आला होता. आता पावसाचा जोर कमी झाल्यानंतर तो पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. पालखेडसह इतर धरणातून देखील विसर्ग कमी करण्यात आला आहे..धरणातून सुरू असलेला विसर्ग सोमवारी (ता. ८) दुपारी ३ वाजताधरण विसर्ग (क्युसेक्स)मुकणे ३६३वालदेवी १७४आळंदी ४४६भावली ५८८भाम १३१०वाघाड १३३३तिसगाव ७२करंजवन ३०१वाकी १९६कडवा ८४०पालखेड २४६६ओझरखेड २८४६नांदुर मधमेश्वर २२३४५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.