Weather Update: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (ता. २३) सकाळी १०.३० वाजेपर्यंतच्या गेल्या २४ तासांत पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात सरासरी ४५.५ मिमी पावसाची नोंद झाली असून, घाटमाथ्यावरील त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यांत अति मुसळधार पाऊस झाला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा आणि नाशिक तालुक्यांतील अनेक महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे..जूनपासून २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात ३२७.४ मिमी, म्हणजेच हंगामाच्या सरासरीच्या ८१.१ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय पर्जन्यमानात त्र्यंबकेश्वरमध्ये सर्वाधिक १९३.३ मिमी, तर सुरगाण्यात १६४.५ मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय नाशिकमध्ये ७३.४ मिमी, तर पेठ तालुक्यात ६६.५ मिमी पाऊस झाला. इगतपुरी, दिंडोरी आणि कळवण तालुक्यांतील काही महसूल मंडलांतही अतिवृष्टी झाली आहे. बागलाण, निफाड, देवळा, चांदवड, सिन्नर, मालेगाव, येवला, नांदगाव आदी तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला..Nashik Rain: नाशिक जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ.घाटमाथ्यावरील जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे..गंगापूर आणि गौतमी गोदावरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (ता. २३) सकाळी ६ वाजल्यापासून पावसाचा जोर कायम आहे. गौतमी धरणातील पूरपाण्याचा विसर्ग आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणात तब्बल १३,००० क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाण्याची आवक आणि जावक यांचा समतोल राखण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी ९.३० वाजता ४,२३६ क्युसेक असलेला विसर्ग दुपारी १२ वाजता ९,९४५ क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला..Nashik Rain Update: नाशिक जिल्ह्यात पावसाची उघडीप.पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या तसेच सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीपात्रात उतरू नये, असा सावधानतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे..या महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंदसुरगाणा (२४३.३), त्र्यंबकेश्वर (२२९.०), वेळुंजे (२०३.५), उंबरठाण (१८४.५), दहाडेवाडी (१४७.५), बाऱ्हे (१३७.०), बोरगाव (१३३.०), मनखेड (१२४.८), नाशिक, पाथर्डी (१००.५), देवळाली (७३.५), भगूर (७१.०), सातपूर (६८.०), मखमलाबाद (६६.५), इगतपुरी, घोटी (६७.३), वाडीवऱ्हे (६८.०), पेठ, जोगमोडी, कोहोर, करंजाळी (६६.५), ननाशी (६६.५), वीरगाव (६७.५) आणि पांढुर्ली (७१.०).भावली, हरणबारी धरणे १०० टक्केजिल्ह्यातील मध्यम व मोठ्या २६ धरण प्रकल्पांतील पाणीसाठा ६१.८६ टक्क्यांवर पोहोचला असून, त्यात झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील भावली व हरणबारी धरणे १०० टक्के भरली आहेत. तर गौतमी गोदावरी, पुणेगाव आणि वालदेवी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. संततधार पावसामुळे धरणसाठ्यात वाढ होत असून, विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. गंगापूर, पालखेड आणि गिरणा धरण समूहातून सर्वाधिक विसर्ग सुरू आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.