Nashik Vidhan Parishad Election Result: नाशिक विधान परिषदेच्या जागेवर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवला. त्यांनी १०९ मतांच्या फरकाने शिंदे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. यामुळे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत १७ पैकी १६ जागा महायुतीने जिंकल्या असल्या तरी नाशिकमधील पराभव शिंदे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा मिळालेले नाही. .या निकालावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी म्हटले, ''भावकीच्या वादातून करेक्ट कार्यक्रम शिंदे गटाचा झाला, असे म्हणायला हरकत नाही. जळगावामध्ये शिंदे गटाने आपल्या मतदाराला शुन्य मते पाडून घेतली. येथे शिंदे गट प्रामाणिक राहिला. त्याचे फळ त्यांना नाशिकमध्ये मिळाले.'' .Vidhan Parishad Election Result 2026: विधान परिषद निवडणुकीत 'महायुती'चा एकतर्फी विजय, पण नाशिकमध्ये उलथापालथ, अपक्ष उमदेवाराची कमाल.दिल्लीतून शिंदेंना बळ देणे. विशेष म्हणजे भाजपच्या इथल्या नेतृत्त्वाच्या उलट बळ देणे, हा प्रकार गेली अनेक दिवस सुरु आहे, सहा खासदार जाण्यामागे दिल्लीची मान्यता असल्याशिवाय शिंदे साहेब निर्णय घेणार नाहीत, असेही पाटील यांनी नमूद केले..Legislative Council Election: विधान परिषद निवडणुकीत तिरंगी लढत.शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला, राऊतांचा दावातर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही या निवडणुकीवरुन मोठे दावे केले आहे. शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपने पाडला. त्याला एकप्रकारे बंड म्हणावे लागेल. प्रचंड पैशाचा वापर झाला. धमक्या दिल्या. गोकुळ गितेंवर दबाव आणला. तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध मतदान केले आणि मोठ्या फरकाने ते निवडून आले, असे राऊत यांनी सांगितले. .नाशिकमधील निकाल आमच्यासाठी धक्कादायक- गिरीश महाजन नाशिकमधील निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. हे कशामुळे झाले? कोण आमच्या बाजूने उभे राहिले नाही. हा संशोधनाचा विषय आहे. दराडे हरल्यामुळे ते वेगळ्या मनस्थितीत आहेत, असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. .तर आर्थिक पाळबळ नसल्याने मी हारलो असल्याची प्रतिक्रिया नरेंद्र दराडे यांनी दिली. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांना ३५७ आणि नरेंद्र दराडे यांना २४८ मते मिळाली. येथे विजयासाठी ३०३ मतांचा कोटा आवश्यक होता. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.