Kharif Season: ऑगस्टपासून ५० दिवसांचा पावसाचा खंड आणि त्यानंतरही प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात उपलब्ध पाणीसाठ्याची कमतरता यामुळे यंदाच्या खरीप कांदा लागवडीला मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये ४० हजार ६७८.१ हेक्टरवर झालेली खरीप कांदा लागवड यंदा २१ हजार २१३ हेक्टरवर आली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १९ हजार ४६५.१ हेक्टरने घट झाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख खरीप कांदा उत्पादक पट्टा यंदा पाणीटंचाईच्या कचाट्यात सापडला आहे..राज्यात नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि लातूर हे खरीप कांदा उत्पादनाचे प्रमुख विभाग आहेत. त्यात नाशिक जिल्हा प्रमुख आगार आहे. मागील वर्षी राज्यातील एकूण खरीप कांदा लागवड ९४ हजार ८८२.२२ हेक्टर होती. त्यापैकी एकट्या नाशिक जिल्ह्यात ४० हजार ६७८.१ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा नाशिकच्या क्षेत्रात ४८ टक्क्यांनी घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यात २०२४-२५ मध्ये ४७ हजार ८३.७ हेक्टरवर खरीप कांदा लागवड झाली होती. त्यानंतर २०२५-२६ मध्ये हे क्षेत्र ४० हजार ६७८.१ हेक्टरवर आले. यंदा मात्र ते थेट २१ हजार २१३ हेक्टरवर घसरले आहे. पूर्व भागात साधारण जुलैअखेरपासून टप्प्याटप्प्याने लागवडी सुरू होतात आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत त्यांना वेग येतो. मात्र, यंदा रोपवाटिकांमध्ये रोपे तयार असूनही शेतात लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड टाळली आहे..Soybean Crop Crisis: पश्चिम विदर्भात सोयाबीन हातातून जाण्याची भीती.काही शेतकऱ्यांनी विहीर, कूपनलिका आणि उपलब्ध अन्य संरक्षित पाण्यावर लागवड केली. मात्र, पावसाचा खंड कायम राहिल्याने आता या लागवडी टिकविण्यासाठी पाण्याचे नियोजन करावे लागत आहे. काही ठिकाणी ठिबकसह सूक्ष्मसिंचनाचा वापर करून उपलब्ध पाण्यात लागवड वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, पाणी नसल्याने तयार रोपे विक्रीसाठी असल्याचे संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहेत. बियाण्याच्या उठावातही दरवर्षीच्या तुलनेत घट झाल्याचे उत्पादकांकडून सांगण्यात येत आहे..उत्पादनावरही परिणामाची शक्यतालागवड क्षेत्र जवळपास निम्म्यावर आल्याने आगामी काळात खरीप कांद्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यातच सध्या लागवड झालेल्या क्षेत्रालाही पाण्याची गरज भासणार असल्याने काढणीपर्यंत प्रत्यक्ष टिकणारे क्षेत्र आणखी कमी होण्याची शक्यता आहे..Rainfall Deficit: पावसाअभावी खरिपातील पिकांनी टाकल्या माना.सध्या बिकट परिस्थितीदरवर्षीच्या तुलनेत बियाण्याचा उठाव कमी.पाण्याची टंचाई असल्याने शेतकऱ्यांची लागवडीसाठी सावध भूमिका.उपलब्ध पाण्यावर कांद्याच्या लागवडीचे नियोजन, सूक्ष्मसिंचन पद्धतीचा अवलंब.काही ठिकाणी लागवडी; मात्र पाण्याअभावी त्या अडचणीत..यंदा लागवड करण्यासाठी पाणीच नाही. रोपे तयार असूनही पाऊस नसल्याने लागवड केलेली नाही. सुमारे ५० दिवसांपासून पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीत लागवड करण्याची मानसिकताच उरलेली नाही.- रघुनाथ खैरनार, कांदा उत्पादक शेतकरी, सायगाव, ता. येवला.दरवर्षी आमची सात ते आठ एकरांपर्यंत कांदा लागवड असायची. यंदा पाण्याच्या तुटवड्यामुळे अवघ्या दोन ते तीन एकरांवर समाधान मानावे लागले. पावसाअभावी उत्पन्नाचे गणित पूर्णपणे बिघडले आहे.- कौतिक जाधव, कांदा उत्पादक शेतकरी, दरेगाव, ता. चांदवड.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.