Nashik News : सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविली जात असून यात संशयास्पद माव्यापासून तयार करण्यात येणारी मिठाई व भेसळयुक्त दुग्धजन्य अन्नपदार्थांच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दुग्धजन्य अन्नपदार्थांसोबतच इतर अन्न खरेदी करताना नागरिकांनी सजगता बाळगणे महत्त्वाचे आहेत. .अन्नाची गुणवत्ता सुनिश्चित तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये करण्यात येते. शासनस्तरावर या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जनजागृतीसह नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, विशेष साह्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले..अन्न व औषध प्रशासन व नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाउस येथे आयोजित ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. झिरवाळ बोलत होते. .Milk Adulteration: ‘मिल्क स्कॅन चाचणी’द्वारे दूधभेसळ रोखणार : मंत्री कदम.या वेळी निमाचे अध्यक्ष आशिष नहार, अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त दिनेश तांबोळी, सहायक आयुक्त मनीष सानप, विनोद धवड, अश्वमेध प्रयोगशाळेच्या डॉ. अपर्णा फरांदे, अन्नसुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, ‘निमा’चे उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील, ‘निमा’च्या अन्नसुरक्षा समितीचे चेअरमन वैभव नागशेठिया, को-चेअरमन भावेश भन्साळी यांच्यासह उद्योजक, अश्वमेध प्रयोगशाळा व के. के. वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते..श्री. झिरवाळ म्हणाले, की नागरिकांना बहुतांश अन्नपदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा कसे? ही तपासणी घरगुती स्तरावर करता येणे प्रत्येकास शक्य आहे. अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे व अन्न व सुरक्षा मानके कायद्याचे महत्त्व यांची शहरासह व ग्रामीण भागात प्रबोधनपर कार्यक्रमातून प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे..Food Adulteration : रायगडमध्ये भेसळखोरांना बसणार लगाम .अन्न पदार्थ तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी व होणारा विलंब टाळण्यासाठी विभागस्तरावर सहा व मुंबई शहरात दोन प्रयोगशाळा स्थापित होणार असून यास मान्यता प्राप्त झाली आहे. निमातर्फे आयोजित जनजागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तूत्य असून नाशिकमध्ये अन्न उद्योग उभारणीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले..प्रशासनाकडून कायद्यांबाबत जनजागृतीसहआयुक्त श्री. तांबोळी यांनी अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सहायक आयुक्त श्री. धवड यांनी अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे महत्त्व व त्यातील विविध कलमांची माहिती दिली. .डॉ. फरांदे यांनी आहारातील विविध पोषणद्रव्यांचे महत्त्व त्याअभावी होणारे विकार यांची माहिती दिली. अश्वमेध प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थांतील भेसळ ओळखण्याची प्रात्यक्षिके सादर केली तर के. के. वाघ महाविद्यालयातीन अन्नतंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थांनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.