Summer Season: शहर व परिसरात उष्णतेची लाट कायम असून, सलग दुसऱ्या दिवशी (ता. २६) कमाल तापमान ४१.४, तर मालेगावचे ४३.२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही होत असून, शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांना असह्य झाले आहे. .सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत जणू अघोषित संचारबंदीसदृश वातावरण असते. दरम्यान, उष्णतेची ही लाट आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे..Dharashiv Heatwave: धाराशिव जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा; नागरिक हैराण.एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. दोन दिवसांपासून यंदाच्या हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या झळांमुळे सर्वसामान्यांना चटके सहन करावे लागतात. .Maharashtra Heatwave Alert: कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता.रविवारी सुटी असूनही उन्हाच्या तीव्रतेमुळे नाशिककरांनी घरातच कुटुंबीयांबरोबर वेळ घालविणे पसंत केले. परिणामी, शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ पाहायला मिळाली. शहराप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही उन्हाळा असह्य झाला आहे. त्यामुळे जनता हैराण झाली..मालेगाव तालुक्यात उन्हाची लाट निर्माण झाली आहे. कमाल पारा ४३.२ अंशांवर स्थिरावल्याने मालेगाववासीयांना घामाच्या धारा लागल्या; तर द्राक्षपंढरी असलेल्या निफाड तालुक्यातही उकाड्यात वाढ झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.