Weather Impact: नाशिक जिल्ह्यात गुरुवारी (ता. २) झालेल्या वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, जिल्ह्यातील सुमारे २६,६१६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. ३१९ गावांमधील ३६ हजार ४०९ शेतकरी या संकटामुळे बाधित झाले आहेत. बागलाण तालुक्यात नुकसानीची तीव्रता सर्वाधिक आहे. निफाड, सिन्नर, नाशिक, कळवण, इगतपुरी, येवला आणि देवळा तालुक्यांत नुकसान नोंदवले गेले आहे..उन्हाळ कांद्याचे सर्वाधिक २१,२३१ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेला कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे. कांद्यासोबतच १,९०१ हेक्टरवरील गहू, ८४३ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले आहे..Nashik Rain Damage: वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पुन्हा तडाखा .बागलाण तालुक्यात ताहाराबाद, अंतापूर, पिंपळकोठे परिसरात सलग चौथ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, हरभरा, मका, टोमॅटो, काकडी, द्राक्ष, डाळिंब पिकांचे नुकसान झाले आहे..Nashik Rain Damage: इगतपुरी, निफाडमध्ये पावसाने झोडपले; ४६ गावांमध्ये पिकांचे नुकसान.निफाड तालुक्याच्या पूर्व भागात सुमारे दीड तास झालेल्या या पावसासोबत काही ठिकाणी तुरळक गाराही पडल्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका या उभ्या पिकांना मोठा फटका बसला. येवला तालुक्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले..शेतकऱ्यांची उडाली तारांबळवादळी वाऱ्यामुळे नाशिक शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. काढलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी हलवताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण झाली. ऐन काढणी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.