Godavari River Overflow : जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २४) सकाळी १० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पश्चिम पट्ट्यात मुसळधार पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर पावसाचा सर्वाधिक जोर राहिल्याने त्र्यंबकेश्वर महसूल मंडलात तब्बल २५२ मिमी, तर वेळुंजे येथे १९५ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गोदावरी नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने विसर्ग सुरू आहे. गोदावरीच्या पुरामुळे नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला असून हजारो एकर शेती व पिके पाण्याखाली गेली आहेत..त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी १६४.९ मिमी, तर नाशिक तालुक्यात ९२.९ मिमी पावसाची नोंद झाली. देवळाली, नाशिक, पाथर्डी, माडसांगवी, भगूर, मखमलाबाद, ओझर, चांदोरी, मोहाडी, सातपूर आणि सायखेडा परिसरातही चांगला पाऊस झाला. मात्र, मालेगाव, नांदगाव, येवला आणि देवळा तालुक्यांत पावसाचा जोर तुलनेने कमी राहिला.पुन्हा आलेल्या पुरामुळे नदीने पात्र सोडून परिसरात पाणी पसरले आहे..Rainfall Deficit India : १०% पेक्षा जास्त पावसाची तूट असेल तर खरीप उत्पादनावर परिणाम; राज्यसभेत केंद्र सरकारची माहिती.गोदाकाठचा परिसर पाण्याखालीगोदावरी नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला असून, त्याचा मोठा फटका नदीकाठच्या गावांना बसला आहे. चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, कोठुरे, मांजरगाव आणि चापडगाव या गावांना पुराचा तडाखा बसल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले. हजारो एकर शेती आणि पिके पाण्याखाली गेली असून, सोयाबीन व भाजीपाला पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.सायखेडा येथील पूल पाण्याखाली गेला आहे. गावात पुराचे पाणी शिरल्याने दुकाने आणि माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला..Rain Update : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम पावसाचा अंदाज.६ धरणे तुडुंबपाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २६ मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ७२.४० टक्के (५१,१३१ द.ल.घ.फु.) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. भावली, वालदेवी, भाम, भोजापूर, हरणबारी आणि केळझर ही सहा धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून त्यातून विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणात ९८.२६ टक्के, तर गौतमी गोदावरी धरणात ९५.३४ टक्के पाणीसाठा झाला आहे..Rainfall Deficit Impacts: पन्नास हजार हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात.गंगापूर धरणातून १५,३८४ क्यूसेक्स, दारणा धरणातून १९,३१२ क्यूसेक्स, कडवा धरणातून १२,८३० क्युसेक्स आणि चणकापूर धरणातून १८,८७९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून ९४,४९७ क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये आणि जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन केले आहे..गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद होऊनही प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना,विविध यंत्रणांतील प्रभावी समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली असून कोणतीही जीवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही.पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता कायम ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. -आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी-नाशिक