Agriculture Department: गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या कारवाईत सिंजेंटा कंपनीच्या पीकवाढीच्या पोषक टॉनिकच्या बनावट विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव आणि निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाने सिंजेंटा इंडियाच्या प्रतिनिधींसोबत संयुक्त कारवाई केली. या कारवाईत ९६ हजार ८९ रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही ठिकाणच्या चौघांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत..कादवा साखर कारखाना परिसरातील ‘गंगामाई ॲग्रो सर्व्हिसेस’ येथे बनावट ‘इसाबियन’ची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ जुलै रोजी डमी ग्राहकाद्वारे त्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर ३० जुलै रोजी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हितेंद्र पगार, कावेरी बागुल आणि दीपक सोमवंशी यांच्या पथकाने दुकानाची तपासणी केली. या वेळी ५२ हजार ५७७ रुपये किमतीच्या एक लिटरच्या २९ बनावट बाटल्या आढळून आल्या. हा माल सील करून जप्त करण्यात आला. दुकानमालक शरद गणपतराव नागरे आणि शशिकांत शांताराम कावळे यांच्याविरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..Agri Input Sale Irregularities: परवाना नसतानाही कृषी निविष्ठांची विक्री; उरुळी कांचन, शिंदवणेत दोन विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे.दरम्यान, ३१ जुलै रोजी पिंपळगाव बसवंत हायवेजवळील ‘महाकाली कृषी सेवा केंद्रा’वरही कृषी विभागाने छापा टाकला. तालुका कृषी अधिकारी मदन शिंदे यांच्या पथकाला येथे ४३ हजार ५१२ रुपये किमतीच्या २४ बनावट बाटल्या आढळून आल्या. या प्रकरणी दुकानाचे संचालक ऋषिकेश पवार आणि वैभव शेळके यांच्याविरुद्ध पिंपळगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे..Agriculture Scam: धाराशिवमध्ये २१ कोटींचा कृषी घोटाळा; १४ अधिकारी निलंबित.सिंजेंटा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी आशिष महेश जांगडा (नोएडा) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता, व्यापार चिन्ह अधिनियम तसेच कॉपीराइट कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव आणि पोलिस उपनिरीक्षक निकिता महाले पुढील तपास करीत आहेत. गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या या कारवाईमुळे कृषी सेवा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या निविष्ठांच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे..सीरियल नंबरची पुनरावृत्ती; पॅकिंगमध्येही फरकतपासणीदरम्यान बनावट मालाचा भांडाफोड करणारे महत्त्वाचे पुरावे समोर आले. बाटल्यांवरील GTIN क्रमांक आणि सीरियल नंबरची पुनरावृत्ती आढळून आली. तसेच मूळ उत्पादनाच्या तुलनेत लेबलवरील लिपी, प्लास्टिक बाटलीचा आकार आणि रंग यामध्ये ठळक तफावत आढळली. त्यामुळे उत्पादन बनावट असल्याचा संशय अधिक बळावला. .विशेष म्हणजे, ‘गंगामाई ॲग्रो सर्व्हिसेस’ने हा माल पिंपळगाव येथील ‘महाकाली कृषी सेवा केंद्र’ आणि ओझर येथील ‘खुशाल एजन्सिज’ यांच्याकडून खरेदी केल्याचे पावत्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बनावट कृषी निविष्ठांचा पुरवठा आणि विक्रीची साखळी तपासण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.