Nashik News : जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर सुरूच असून शनिवार (ता. २७) रोजी जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस कोसळत होता रविवार (ता.२८) रोजी जवळपास १०० महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रामुख्याने येवला, पेठ, दिंडोरी, नांदगाव, सुरगाणा या तालुक्यात सर्वाधिक फटका असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले. .अवघ्या १२ तासातच झाल्याने दाणादाण उडाली. यामध्ये खरीप पिकांसह, भाजीपाला, कांदा लागवडी पाण्याखाली गेल्या आहेत तर बहुतांश नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला तर शिवारात देखील पाणीच पाणी आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडाला शिवारांमध्ये भयाण परिस्थिती असून पिकांचे नुकसान वाढल्याने शेतकरी तणावाखाली आहेत. .Rain Crop Damage : अमरावती जिल्ह्यात ५१ हजार हेक्टरवरील पिके नष्ट.अगोदरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण नसताना हे नवे संकट शेतकऱ्यांना पूर्णता अडचणीत आणणारे ठरले आहे. जिल्हाभरात सध्या ओल्या दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. मका, सोयाबीन, कापूस, कांदा यांचे मोठे नुकसान तर भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब उत्पादक अडचणीत आहे पूर्व भागातील तालुके यात सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.शनिवारी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर तो रविवारी देखील कोसळत होता येवला, नांदगाव, चांदवड, निफाड तालुक्यात सर्वात मोठा फटका आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना एकच वेळी पूरस्थिती आहे. मका, सोयाबीन, कांदा पिकांचे मोठे नुकसान आहे. पावसासह वादळी वाऱ्यामुळे मका पीक आडवे झाले आहे. तर साठवलेला जनावरांचा चारा वाहून गेल्याचे अडचणीत वाढ झाली आहे..बागलाण, मालेगाव तालुक्यात मक्याचे पीक आडवे झाले आहे. तर थोड्याफार वाचलेल्या कापूस लागवडीच्या नुकसानीत वाढ झाली आहे. इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात लागवडी पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्याने दारणा, गंगापुरसह पश्चिमपट्ट्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे..पालखेड धरणातून सर्वाधिक २९ हजार १०४, करंजवणमधून १४ हजार ५७० तर दारणा धरणातून १२ हजार १६७, सर्वाधिक क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणातून दुपारी दोन वाजता विसरत वाढविण्यात आला असून तो ९,८२८ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. तर नांदुरमधमेश्वर धरणातून ५७ हजार ४२६ क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे..अंदरसुल(ता. येवला) येथे कोळगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने संसाराचे नुकसान झाले. तर येथील गवळी वस्ती येथे नाना सैंदर व साखराबाई सैंदर हे वृद्ध दांपत्य पुराच्या विळख्यात अडकले होते. त्यांना प्रशासनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर १५ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे..Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.दुष्टिक्षेप..नांदूर मध्यमेश्वर विसर्ग दुपारी २ वाजता वाढवून ७९,५४१ क्युसेक्स इतका वाढविण्यात आला आहे.कांदा रोपवाटिका व टाकलेले कांदा बियाणे पावसामुळे गेले आहे.सर्वत्र नुकसान दिसून येते असल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश आहे.शेतकऱ्यांच्या वेदना सरकारने बांधावर येऊन पाहाव्यात आणि सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत..जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनजिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. धरणांमधून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी नदीनाल्यांना पुर आलेला आहेत. रस्ते, पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये, जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला असल्याने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी. शेतकऱ्यांनी आपली जनावरे तसेच शेतीचे साहित्य सुरक्षितस्थळी हलवावे,.असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे..पाऊस ठरला जीवघेणामळगाव (ता.मालेगाव) येथील समाधान वाकळे (वय १६) मेंढ्या चारण्यासाठी गेला असता सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्याच्यासह वीज कोसळली. यात समाधानला गंभीर इजा झाली असून, उपचारांसाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत सुमारे १० मेंढ्यांचा मृत्यू झाला. गोराणे (ता.बागलाण) येथे जोरदार पाऊस, विजांमुळे घराची भिंत कोसळली.या दुर्घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला असून, अन्य एक महिला जखमी झाली. येवला तालुक्यात देखील अनेक ठिकाणी घरांची व झाडांची पडझड आहे. कडेगहाण येथील अनिल सावंजी वाघेरे यांची म्हैस वीज पडून मृत्यू झाला..या महसूल मंडळात सर्वाधिक अतिवृष्टीमहसूल मंडळ पाऊस(मिमी)जातेगाव ११२न्यायडोंगरी १३१.५बाऱ्हे १४४मनखेड १४४ननाशी १४४.८पेठ १४४.८जोगमोडी १४४.८कोहोर १४४.८करंजाळी १४४.८नायगाव १०३.५येवला ११९.५नगरसुल १५५.५अंदरसूल १५५.५सावरगाव ११९.५.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.