Crop Compensation: जून ते सप्टेंबरमधील अतिवृष्टी–पूरामुळे बाधित झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रतिहेक्टरी अनुदान जलदगतीने जमा केले जात आहे. आतापर्यंत पाचही जिल्ह्यांतील १६.५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ९०३ कोटी रुपये वर्ग झाले आहेत.