Maharashtra Drought : नाशिक ‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदा नाशिक विभागात मॉन्सूनने पाठ फिरवली असून, विभागात वार्षिक सरासरीच्या केवळ ६६ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्याची स्थिती सर्वाधिक चिंताजनक असून, तेथे वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला. पावसाची मोठी तूट लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी महसूल आणि जलसंपदा विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली..अवघ्या महाराष्ट्रावर यंदा मॉन्सूनची अवकृपा झाली आहे. राज्य सरकारने तब्बल २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून ‘ट्रिगर-१’ अंतर्गत दुष्काळी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले..Drought Protest: दुष्काळाच्या मुद्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विहिरीत आंदोलन.नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांचा विचार करता पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे विभागातील ५४ पैकी तब्बल ४९ तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला..Drought Relief : दुष्काळी सवलती, उपाययोजना अमंलबजावणीचा अहवाल सादर करा:संजयसिंह चव्हाण.नाशिक विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७०७ मिलिमीटर आहे. यंदा मात्र केवळ ४६६ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत पावसात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. विभागात धुळे जिल्ह्यात सर्वाधिक ८२ टक्के पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५३५ मिलिमीटर असताना प्रत्यक्षात ४३९ मिलिमीटर पाऊस झाला. त्याखालोखाल जळगावमध्ये ७७, नाशिकमध्ये ७०, तर अहिल्यानगरमध्ये केवळ ६८ टक्के पाऊस झाला..यंदाचे वर्ष ठरले नीचांकीनाशिक विभागातील गेल्या सहा वर्षांतील पावसाचे प्रमाण पाहता तीन वर्षे सरासरीपेक्षा अधिक तसेच निम्मी वर्षे सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची नोंद झाली आहे. सन २०२१, २२ व २४ मध्ये सरासरीच्या ७८० मिमीहून अधिक पाऊस झाला; तर यंदाचे वर्ष हे सर्वाधिक भयावह ठरले असून, सहा वर्षांतील सरासरीच्या सर्वांत नीचांकी म्हणजेच ४६५.५ मिलिमीटर पर्जन्याची नोंद झाली. या आकड्यांवरूनच विभागातील दुष्काळाची गंभीर स्थिती लक्षात येते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.