Water Storage : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मोठ्या व मध्यम अशा २६ धरणांमध्ये शनिवार (ता. २७) रोजी ८१.६२ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी २७ जुलैच्या तुलनेत हा साठा १३ टक्क्यांनी अधिक होता. त्यामुळे पिण्याचे पाणी, सिंचन आणि औद्योगिक वापराच्या दृष्टीने दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, १५ धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे..जिल्ह्यातील सात मोठे व १९ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ७०,६१९ दशलक्ष घनफूट असून, त्यापैकी ५७,६४० दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात ८८.८६ टक्के पाणीसाठा झाला आहे. या समूहातील आळंदी धरण १०० टक्के भरले असून, गंगापूर, काश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, गंगापूर धरणातून ४,९४७ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे..Maharashtra Dam Water Update: धरणांतील आवकेत वाढ.पालखेड धरण समूहातील ओझरखेड व वाघाड धरणे भरली असून, पालखेड, करंजवन आणि पुणेगाव धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तिसगाव धरणही भरण्याच्या मार्गावर आहे. पश्चिम पट्ट्यातील सर्वांत मोठ्या दारणा धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. भावली, वालदेवी, भाम आणि भोजापूर ही धरणे भरली असून, मुकणे व वाकी धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे..गिरणा खोरे धरण समूहातील हरणबारी व केळझर ही धरणे काठोकाठ भरली आहेत. चणकापूर धरणातही ७३ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला असून, पुनद धरणातील साठ्यात वाढ होत आहे. दुसरीकडे, नागासाक्या धरणात केवळ ०.५० टक्के, तर माणिकपुंज धरणात २.०२ टक्के पाणीसाठा असून, ही धरणे अद्याप कोरडी असल्याने त्या भागातील पाणीस्थिती चिंताजनक आहे..Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरण ७३ टक्के भरले.सध्या जिल्ह्यातील विविध धरणे व बंधाऱ्यांतून एकूण ९३ हजार ३५५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर व पालखेड धरण समूहातील पुराचे पाणी नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात दाखल होत असून, तेथून ४३ हजार ६८ क्युसेक्सने गोदावरी नदीमार्गे जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत हा विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला असला, तरी नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे..त्र्यंबकेश्वर तालुक्यात सलग सातव्या दिवशी अतिवृष्टीसोमवार (ता. २७ जुलै) रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या मागील २४ तासांत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तालुक्यात सलग सातव्या दिवशी अति मुसळधार पाऊस झाला. ठाणापाडा येथे सर्वाधिक ८६.५ मिमी, वेळुंजे येथे ७१.५ मिमी, हरसूल येथे ६७ मिमी, तर त्र्यंबकेश्वर आणि दहाडेवाडी येथे प्रत्येकी ४८ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत तालुक्याची सरासरी पर्जन्यमान १११.८ मिमी इतकी राहिली आहे. नाशिक, पेठ आणि इगतपुरी तालुक्यांतही मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली..धरणांमधून सुरू असलेला विसर्ग(क्युसेक्समध्ये, २७ जुलै, सकाळी १० वाजता)गंगापूर ४,९४७काश्यपी १,०००गौतमी गोदावरी ५००पालखेड ४,९५६ओझरखेड १,६०२पुणेगाव १,५६८दारणा १३,२५०भावली ९४८वालदेवी १,३०५कडवा ६,२१६भाम २,२४८भोजापूर ५४०चणकापूर ६,७६७हरणबारी २,५८८केळझर ५९०नांदूरमध्यमेश्वर (बंधारा) ७१,०३६.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.