Nashik News : ऑगस्ट महिन्यात पावसाने जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार हजेरी लावली.त्यामुळे यंदा मोठ्या ७ व मध्यम १९ अशा एकूण २६ धरण प्रकल्पांमध्ये पाणी साठा ९४ टक्क्यांवर आहे.तर यापैकी ११ धरणे तुडुंब भरली आहेत. मागील वर्षी १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील धरण साठा ६१ हजार ०१० दलघफु इतका होता.तर यंदा तो ६६ हजार ९०३ दलघफु इतका आहे. त्यामुळे यंदा ८ टक्के अधिक पाणीसाठा आहे. .यंदा जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली तर ऑगस्ट महिन्यापर्यंत पावसाने जोरदार हजेरी विविध भागात लावली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने धरणांचे पाणलोट क्षेत्र असलेल्या इगतपुरी, त्रंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण, सटाणा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर दिसून आला. .Water Project Storage : सातपुड्यातील प्रकल्प भरू लागले .यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.त्यामुळे एकीकडे भूजल पातळी वाढण्यास मदत झाली तर दुसरीकडे धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यात मोठी मदत या पावसामुळे झाली.जिल्ह्यातील २६ धरण प्रकल्पांतील एकूण संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ७० हजार ६१९ दलघफू इतका आहे.तर १ सप्टेंबर अखेर तो ६६ हजार ९०३ इतका झाला आहे. .त्याची टक्केवारी ९४.७४ टक्के इतकी आहे. जिल्ह्यातील धरण साठ्यांमधून दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील आवर्तन, पिण्याचे पाणी व औद्योगिक वापरासाठी असे नियोजन केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक शहरासाठी गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो.या धरणात सध्या ९७.१० टक्के इतका पाणीसाठा आहे..Water Storage : लहानमोठ्या प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा.धरणात ५,४६७ दलघफू पाणीसाठा असून धरणातून पाण्याचा येवा असल्याने ५५३ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.इगतपुरी तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्याने या तालुक्यातील धरणांमधून विसर्ग सोडण्यात येत आहे. पश्चिम पट्ट्यातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या दारणा धरणातून ३,८०४ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. .काश्यपी, आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, भाम, हरणबारी, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे गंगापूर पालखेड व गिरणा अशा तीनही धरण समूहांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. सर्वच धरणांमध्ये सध्या ८६ टक्क्यांवर पाणीसाठा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.