Nashik to Akkalkot Greenfield Highway Project: नाशिक ते अक्कलकोट या महत्त्वपूर्ण सहापदरी ‘ग्रीनफिल्ड’ महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अक्कलकोट तालुक्यातील ३४ किलोमीटर अंतरापैकी आतापर्यंत ४६.७५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभागाने ठेवले आहे. .हा केवळ एक रस्ता नसून अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडणारे मोठे नेटवर्क आहे. अक्कलकोटपासून तीन किलोमीटर अंतरावर उभारले जाणारे ‘ट्रम्पेट इंटरचेंज’ या मार्गाचे मुख्य आकर्षण आहे. या इंटरचेंजमुळे सोलापूर, पुणे, हैदराबाद आणि विजयवाडा या शहरांना थेट मार्ग मिळणार आहे..Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल.तसेच जेऊर, टाकळी मार्गे विजयपूरकडे जाणारा प्रवासही सुलभ होईल. विशेष म्हणजे, श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. या रस्त्याची रुंदी ३३ मीटर (१०९ फूट) असून संपूर्ण रस्ता डांबरीकरणाचा आहे. तालुक्यातील प्रमुख गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आठ ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे..Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही.ट्रम्पेट इंटरचेंज यामध्ये तीन अंडरपास असतील, एक सोलापूर-अक्कलकोट रोड क्रॉसिंगसाठी, दुसरा मुख्य कॅरेजवेवरील लूप वाहतुकीसाठी आणि तिसरा क्रॉस रोड वाहतुकीसाठी असेल. मुख्य लूपवर टोल बूथ आणि प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतील. या महामार्गामुळे केवळ वाहतुकीची कोंडी सुटणार नाही, तर अक्कलकोटच्या औद्योगिक आणि धार्मिक पर्यटनालाही भविष्यात मोठी गती मिळणार आहे..महामार्गावरील सर्व उड्डाणपूल, इंटरचेंज आणि मुख्य रस्त्यांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे.स्वप्नील कासार, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग सोलापूर विभाग, सोलापूर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.