Maharashtra Loan Waiver: राज्य सरकारने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत तिसरी लाभार्थी यादी मंगळवारी (ता. १३) जाहीर केली. या यादीत नाशिक जिल्ह्यातील ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४४ हजार ३८७ शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी ३६ हजार १६७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. .उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांच्या मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ दिला जात आहे. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २३ हजार ७७१, तर राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ४२ हजार २३५ अशा एकूण ६६ हजार ६ खातेदारांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे..Farm Loan Waiver Third List: कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, ३ लाख ५१ हजार १९२ शेतकऱ्यांचा समावेश .पात्र लाभार्थ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांतील ज्या शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांची कर्जखाती शासनाच्या ‘हेअरकट’ धोरणानुसार पूर्णपणे निरंक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे..थकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरण कराशेतकऱ्यांची कर्जथकबाकी ३१ मार्च २०२६ रोजीच्या स्थितीनुसार निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०२६ पासूनचे पुढील व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्जथकबाकीची खातरजमा करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया जवळच्या आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रात विनामूल्य करता येईल..Farm Loan Waiver: कर्जमाफीच्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरण सुरु, ३ लाख २७ हजार लाभार्थी शेतकरी.मृत, वयोवृद्ध लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यपद्धतीयोजनेतील पात्र लाभार्थ्याचा मृत्यू झाला असल्यास किंवा वयोमानामुळे बोटांचे ठसे नोंदविण्यात अडचणी येत असल्यास, कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी विशेष मानक कार्यपद्धती निर्गमित करण्यात आली आहे..पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शासनाच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा. आधार प्रमाणीकरण बाकी असलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार किंवा ई-सेवा केंद्रात जाऊन ही प्रक्रिया विनामूल्य पूर्ण करावी.कुंदन भोळे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.तीन टप्प्यांत लाभार्थी याद्याशासनाने २८ जुलै रोजी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ३५ हजार ८९० शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी ३३ हजार ३७३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या दुसऱ्या यादीत ३ हजार ८०६ शेतकऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी २ हजार ७९४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. आता तिसऱ्या यादीत ४ हजार ६९१ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.