Lunar Mission: केप कॅनव्हेराल (वृत्तसंस्था) ः अर्धशतकाहून अधिक कालावधीनंतर मानवजातीच्या पहिल्या चांद्रप्रवासाला गुरुवारी पहाटे (भारतीय वेळेनुसार) चार अंतराळवीरांनी प्रारंभ केला. पुढील दोन वर्षांत चंद्रावर मानव सुरक्षितरित्या उतरविण्याच्या ध्येयाकडे ‘नासा’ने (अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था) टाकलेले हे पहिले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. .या ‘आर्टिमिस-२’ मोहिमेच्या उड्डाणाने केवळ अंतराळ संशोधनाला नवे वळण दिले नाही, तर चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्तीच्या स्वप्नालाही नवे पंख दिले आहेत, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी या मोहिमेचे वर्णन केले आहे..Student International Visit: ‘झेडपी’चे विद्यार्थी देणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट.चार अंतराळवीरांना घेऊन नासाच्या ‘स्पेस लाँच सिस्टिम (एसएलएस) या रॉकेटच्या साहाय्याने ओरायन यानाने फ्लोरिडा येथील केनेडी अवकाश केंद्रामधील उड्डाण तळ ‘३९-बी’ वरून भारतीय वेळेनुसार गुरुवारी पहाटे ३.५४ वाजता यशस्वी उड्डाण केले. .Har Ghar Jal Mission: ‘हर घर जल’ योजनेला ब्रेक.या मोहिमेद्वारे ओरायन अंतराळयानातून चार अंतराळवीर चंद्राभोवतीच्या नियोजित चाचणी मोहिमेसाठी रवाना झाले आहेत. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दहा हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. १९६०-७० च्या दशकातील ‘अपोलो’ मोहिमांची आठवण यावेळी अनेकांनी काढली..अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याची मोहिम ‘नासा’ने पुन्हा सुरू केली आहे. अर्धशतकाचा खंड हा केवळ अल्प विश्रांतीचा होता.जेरेड आयझॅकमॅन, प्रशासक, नासा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.