Poor Drainage Infrastructure: पिपरा-तुमसर मार्गावरील साखळी-पिपरा फाटा परिसरातील अरुंद नाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असून सुमारे ३० ते ४० हेक्टर शेती पाण्याखाली जात आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाल्याचे तातडीने खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे..शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सध्याच्या पुलाखाली पाण्याचा प्रवाह होण्यासाठी उपलब्ध जागा अपुरी आहे. त्यामुळे मुसळधार पावसानंतर कालव्यातील पाणी अडून मागे साचते आणि पिंपरा व साखळी परिसरातील शेतांमध्ये शिरते. .Heavy Rainfalll Damage: नांदुरा तालुक्यात मुसळधार पावसाचा तडाखा; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.परिणामी दरवर्षी पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी मागील तीन वर्षांपासून संबंधित विभाग, स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री तसेच प्रशासनाकडे वारंवार निवेदने दिल्याचा दावा केला आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. .Paddy Seedlings Damaged: जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात भातरोपांचे नुकसान.शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पुलाचे तांत्रिक सर्वेक्षण करून नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत होऊन पूरस्थिती टळेल, असा त्यांचा विश्वास आहे. मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे..पावसाळ्यात ३० ते ४० हेक्टर शेती पाण्याखाली जाते. मागील तीन वर्षांपासून निवेदने देऊनही प्रश्न सुटलेला नाही. यंदाही काम झाले नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू.- तेजस गजभिये, बाधित शेतकरी, पिपरा रोड, तुमसर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.