Akola Tourism Spot: सातपुड्याच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून, जंगल सफारी, बोटिंग, ट्रेकिंग, सुळई धबधबा, व्हॅली क्रॉसिंग आणि रॅपलिंगला वाढता प्रतिसाद मिळत आहे. .समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार १६१ फूट उंचीवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील नरनाळा किल्ल्याचे क्षेत्रफळ ३९२ एकर आहे. सुमारे २४ मैल (३८.५ किमी) लांबीच्या या किल्ल्यात २२ तलाव, २२ दरवाजे आणि सुमारे ३६० बुरूज आहेत. महाकाली दरवाजा, जाफराबाद व तेलियागड यांसारख्या ऐतिहासिक वास्तू पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात..Vedkasturi Tourism Centre: जुन्नरची वैभवशाली संस्कृती जपणारे वेदकस्तुरी पर्यटन केंद्र .मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अकोट वन्यजीव विभागातर्फे जंगल सफारीची सुविधा उपलब्ध आहे. ऑक्टोबर २०२४ ते जून २०२५ दरम्यान १ हजार ६२३ जिप्सीतून ९ हजार १२ पर्यटकांनी सफारी केली. ऑक्टोबर २०२५ ते जून २०२६ या कालावधीत २ हजार ७६२ जिप्सीतून १५ हजार ४८७ पर्यटकांनी सफारी केली..Melghat Tiger Reserve : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा.मॉन्सूनमध्ये १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान कुठर परिसरातील ट्रेकिंग, सुळई धबधबा आणि सुळई नाला परिसरातील साहसी उपक्रमांना संधी आहे. पोपटखेड धरणावर सुरू करण्यात आलेल्या बोटिंगला फेब्रुवारी २०२६पासून ७ हजार ११० पर्यटकांनी भेट दिली आहे. शहानूर संकुलात सहा टेंट, सहा हट्स आणि १४ बेडच्या दोन डॉर्मेटरीची सुविधा करण्यात आली आहे..नवीन पूल, सफारी गेट, मचान, गॅझिबो, व्हीआर गॉगल, मिनी थिएटर, सेल्फी पॉइंट आणि बचत गटामार्फत कॅन्टीनही सुरू करण्यात आली आहे. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.