अमृता शेलारनॅनो सेलेनियममुळे वनस्पतींची सर्वांगीण वाढ, बीजांकुरणाला गती, हरितद्रव्य निर्मिती, प्रकाशसंश्लेषण, नत्र शोषण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी साह्य मिळत आहे. हा घटक अतिशय कमी प्रमाणात (मायक्रो ग्रॅम/नॅनो ग्रॅम) वापरूनही मोठा परिणाम मिळतो. पर्यावरणस्नेही शेतीसाठी, अधिक उत्पादनक्षमतेसाठी नॅनो सेलेनियम हा चांगला पर्याय आहे. .पीक व्यवस्थापनामध्ये नत्र, स्फुरद, पालाश, जस्त, बोरॉन, मॅग्नेशिअम यांसारख्या पोषणतत्त्वांचा वापर वाढलेला आहे. याचबरोबरीने सेलेनियम देखील पीक पोषणासाठी आवश्यक आहे. सेलेनियम या मूलद्रव्याचा शोध १८१७ मध्ये स्वीडनमधील शास्त्रज्ञ यॉन्स बेरझेलिअस यांनी लावला. तेव्हा ते सल्फरवर संशोधन करत असताना एक नवीन काळसर स्वरूप आढळून आले. हे स्वरूप नंतर ‘सेलेनियम’ या नावाने ओळखले जाऊ लागले..Crop Management: नॅनो सेलेनियमचा वापर करताना काय काळजी घ्यावी?.प्रारंभी हे मोठ्या कणांच्या स्वरूपात वापरले गेले, जे वनस्पती आणि मानवासाठी अत्यंत मर्यादित प्रमाणातच उपयुक्त ठरले. काळसर सेलेनियम मोठ्या प्रमाणात दिल्यास वनस्पतींच्या पेशींमध्ये विषारी प्रभाव निर्माण होतो. मुळांची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात, व निर्मित अन्नाचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी सेलेनियमच्या वापराला विरोध केला, त्यामुळे ते एक ‘घातक सूक्ष्मतत्त्व’ मानले गेले. परंतु हे मूलद्रव्य झाडांना फार कमी मात्रेत लागणारे आहे., योग्य वेळी मिळाले तर झाडाच्या आरोग्याला बळ देणारे आहे. .सेलेनियम दुर्लक्षित का राहिले ?वनस्पती पोषणशास्त्रात सेलेनियम या घटकाकडे फारसे लक्ष दिले गेले नाही, कारण याचे अनेक कारणे होती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, पूर्वी उपलब्ध असलेल्या मोठ्या कणांच्या स्वरूपातील (बल्क फॉर्म) सेलेनियममुळे अनेक वेळा विषारी परिणाम दिसून आले होते. त्यामुळे संशोधक या घटकापासून सावध राहिले. सेलेनियमची वनस्पतीसाठी लागणारी मात्रा ही अतिशय सूक्ष्म, म्हणजे मायक्रोग्रॅम पातळीवर असते, ज्यामुळे त्याचे महत्त्व लक्ष वेधून घेत नाही. याव्यतिरिक्त, याआधी सेलेनियमचे फायदे फारसे स्पष्टपणे संशोधनाविना दिसून येत नव्हते, त्यामुळे त्याच्या पोषणमुल्यांकडे दुर्लक्ष झाले. .Nano Fertilizers: नॅनो खते जागरूकता अभियानाचा कोल्हापुरात प्रारंभ.पीक व्यवस्थापनात नत्र, स्फुरद, पालाश यावर भर दिला जातो. कारण हे घटक लगेच परिणाम दाखवतात. पण सेलेनियम सूक्ष्म मूलद्रव्य असल्याने त्याच्या अभ्यासात सातत्य राहिले नाही. आता नॅनो स्वरूपातील सेलेनियम विकसित करण्यात आले आहे, तेव्हा त्याचे जैविक परिणाम, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे गुणधर्म आणि प्रकाशसंश्लेषणास चालना देणारी क्षमता दिसून येत आहे. म्हणूनच, सेलेनियम संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे.नॅनो सेलेनियमचा फायदा नॅनो तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सेलेनियमचे सूक्ष्म व स्थिर कण तयार करता येतात. याचे नवीन स्वरूप म्हणजे घन तांबूस लालसर रंगाचे नॅनो सेलेनियम. याच्या आकारमानात लक्षणीय घट झाल्यामुळे (साधारणतः २०-८० नॅनोमीटर), हे स्वरूप विषारी ठरत नाही. हे वनस्पतींच्या वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि अणुरूप संरक्षक (अँटिऑक्सिडंट) म्हणून कार्य करते..नॅनो कण वनस्पतीच्या पेशींमध्ये अचूक ठिकाणी पोहोचतात, तेथे सक्रिय होतात. वनस्पतीतील तणावकारक परिस्थितींना सामोरे जाण्याची ताकद वाढवतात.नॅनो सेलेनियम वनस्पतीत विविध जैविक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. हे अणुरूप पोषणतत्त्व वनस्पतीच्या पेशींमध्ये अनेक स्तरांवर कार्य करते. त्यामुळे संपूर्ण वाढीवर, रोगप्रतिकारक क्षमतेवर आणि उत्पादनक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.वनस्पतींना प्रकाश, तापमानातील चढउतार, कीटकनाशकांचा वापर, पाणीटंचाई किंवा इतर पर्यावरणीय तणावांमुळे ताण येतो. अशा तणावांच्या वेळी वनस्पतीमध्ये काही हानिकारक अणू तयार होतात, ज्यांना मुक्त रॅडिकल्स म्हणतात. हे अणू पेशींना नुकसान करतात. नॅनो सेलेनियम हे अत्यंत प्रभावी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. या मुक्त रॅडिकल्सना नष्ट करून पेशींचे संरक्षण करते..Nano Urea: नॅनो युरियाच्या वापराने उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत होते?.नॅनो सेलेनियममुळे हरितद्रव्य (क्लोरोफिल) तयार होण्याची प्रक्रिया वेगाने घडते. यामुळे प्रकाश संश्लेषण अधिक परिणामकारक होते. परिणामी, वनस्पती अधिक अन्न तयार करते, वाढीला चालना मिळते आणि पोषणद्रव्यांचा साठा वाढतो.नॅनो सेलेनियममुळे नायट्रोजनचे शोषण अधिकप्रभावीपणे होते. नत्र हे वनस्पतीसाठी एक अत्यावश्यक पोषणतत्त्व असून, त्याच्या साह्याने प्रथिनांची निर्मिती, पेशी विभाजन आणि वाढ होते. यामुळे झाडांची उंची, फांद्या, पाने आणि नंतर फुले व फळांची वाढ अधिक जोमाने होते.बियाणे अंकुरित होण्याच्या प्रक्रियेत नॅनो सेलेनियम महत्त्वाची भूमिका बजावतो. अतिशय कमी प्रमाणात दिले तरीही ते बीजांकुरणाची गती वाढवते. बिया लवकर फुटतात आणि मुळे मजबूत व लांब होतात. यामुळे झाड जमिनीत अधिक घट्ट रुजते. पोषणद्रव्ये अधिक चांगल्या पद्धतीने शोषते. नॅनो सेलेनियमचा वापर हा केवळ उत्पादन वाढविण्यापुरता मर्यादित न राहता, तो वनस्पतीच्या आरोग्याचे संरक्षण करणारा अत्यावश्यक घटक आहे..नॅनो सेलेनियम निर्मितीची प्रक्रिया नॅनो सेलेनियम तयार करण्यासाठी विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो, ज्यामुळे सेलेनियमचे कण नॅनो स्तरावर (अतिशय लहान) तयार होतात. या प्रक्रियेमुळे सेलेनियम अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि वनस्पतीसाठी फायदेशीर स्वरूपात उपलब्ध होते. रासायनिक प्रक्रिया (रासायनिक घटकांचा वापर) या पद्धतीमध्ये सोडियम सेलेनाइट या संयुगाला कमी करण्यासाठी एखादा कमी करणारा घटक वापरला जातो. .Nano Urea and Agricultural Drones : कृषीत नॅनो युरिया आणि कृषी ड्रोनच्या वापरामुळे क्रांती होतेय : केंद्रीय मंत्री जोशी .सर्वसामान्यतः अॅस्कॉर्बिक अॅसिड यासाठी वापरले जाते. रासायनिक प्रतिक्रिया झाल्यानंतर तांबूस लालसर रंगाचे नॅनो सेलेनियम तयार होते. ही पद्धत तुलनात्मकदृष्ट्या सोपी असून, नियंत्रण ठेवून वापरल्यास चांगले परिणाम देते.हिरव्या पद्धतीची प्रक्रिया (वनस्पती आधारित सेंद्रिय पद्धत) या पद्धतीत हळद, आवळा, लसूण यांसारख्या औषधी वनस्पतींचे अर्क वापरले जातात. या अर्कांमध्ये नैसर्गिक जैविक घटक असतात, जे सेलेनियम आयन कमी करून नॅनो स्वरूपात परिवर्तित करतात. .ही पद्धत पर्यावरणपूरक, कमी खर्चीक व सुरक्षित असल्यामुळे ग्रामीण भागात किंवा लघुउद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. सूक्ष्मजीव आधारित प्रक्रिया (सूक्ष्मजीव जैवतंत्रज्ञान)ही एक अत्याधुनिक पद्धत असून, काही विशिष्ट सूक्ष्मजीव सोडियम सेलेनाइटचे रूपांतर नॅनो सेलेनियममध्ये करतात. .Nano Fertilizers : नॅनो खतांचा व्हावा सखोल अभ्यास.या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजैविक अभिक्रियांद्वारे अत्यंत सूक्ष्म आणि जैव सुसंगत नॅनो कण तयार होतात. ही प्रक्रिया शाश्वत व पर्यावरणस्नेही असल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ शकते.या पद्धतींच्या साहाय्याने तयार झालेले नॅनो सेलेनियम शेतीमध्ये फवारणी, जमिनीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय द्रावणांमध्ये मिसळून वापरता येते, ज्यामुळे वनस्पतींच्या वाढीला, उत्पादनाला आणि प्रतिकारशक्तीला मोठी चालना मिळते..नॅनो सेलेनियमचा वापर करताना नॅनो सेलेनियमचा शेतीमध्ये वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे अति सूक्ष्म स्वरूप असल्याने अत्यल्प प्रमाणात वापरूनही उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात.मायक्रो ग्रॅम किंवा नॅनो ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणातच ते प्रभाव दाखवते. त्यामुळे अति प्रमाणात वापर केल्यास वनस्पतींना त्रास होऊ शकतो. याचा वापर सेंद्रिय खतांमध्ये, औषधी वनस्पतींच्या अर्कात किंवा द्रावणांमध्ये मिसळून करता येतो. हे पानांवर फवारणी करून किंवा थेट मुळांद्वारे शोषणासाठी वापरता येते. कोणतीही पद्धत वापरताना प्रयोगपूर्व चाचणी घेणे आणि शास्त्रज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापरल्यास नॅनो सेलेनियम हे वनस्पतींच्या पोषणात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात खूपच उपयुक्त ठरते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.