Naneghat Inscription: जुन्नर तालुक्यातील नाणेघाट येथील २१०० वर्षे प्राचीन सातवाहनकालीन शिलालेखाच्या संवर्धनासाठी पुरातत्त्व विभागातर्फे काचेचे आवरण बसविण्यात आले आहे. जागतिक संग्रहालय दिनानिमित्त सोमवारी (ता. १८) अत्याधुनिक दरवाजा, काचेचे संरक्षण आणि ऑडिओ गाइड सुविधेचे उद्घाटन केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या प्रादेशिक संचालिका टी. श्रीलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले..कल्याण ते पैठण या प्राचीन व्यापारी मार्गावरील नाणेघाट लेणीत राणी नागणिकेने हा शिलालेख कोरला होता. ब्राह्मी लिपी आणि प्राकृत भाषेतील या २० ओळींमधून सातवाहन काळातील सामाजिक, राजकीय आणि गणित ज्ञानाची माहिती मिळते..Honeybee Conservation: मधमाशी संवर्धन काळाची गरज.मात्र, पर्यटकांचा वाढता राबता, लेणीत होणारा स्वयंपाक आणि हाताळणीमुळे या ऐतिहासिक ठेव्याची झीज होत होती. काही अक्षरेही निखळली होती.या गंभीर समस्येकडे ‘सकाळ’ने सातत्याने लक्ष वेधले होते. तसेच, ‘गुंज इंडिया’तर्फे पर्यटकांना क्यूआर कोडद्वारे ऑडिओ गाइडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे..Environment Conservation: अकोला गार्डन क्लब करतेय पर्यावरणाचे संवर्धन.या वेळी पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी ए. व्ही. नागणोर, मनीष राय, विलास रामटेके, विनयानंद मोहड, रवी राज, राजेंद्र दिवेकर, बजरंग एलिकर, गजानन मंडावरे, विनायक खोत, ओंकार गरूड, घाटघरच्या उपसरपंच सुमन आढारी, इतिहास अभ्यासक व ग्रामस्थ उपस्थित होते..शिलालेखाचे दीर्घकालीन जतन व्हावे यासाठी येथे काचेचे संरक्षण कवच बसविण्यात आले आहे. तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांनी या ऐतिहासिक ठेव्याचा आदर करावा. ऑडिओ गाइडच्या माध्यमातून त्यांना त्याची प्राथमिक माहिती होईल.डॉ. अभिजित आंबेकर, अधीक्षक पुरातत्त्वशास्त्रज्ञ भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.