Weed Control: नंदुरबारजिल्ह्यात ऊस पिकात आंतरमशागत आणि फवारणीची कामे सुरू आहेत. मजूर उपलब्ध होत नसल्याने तणनाशकांचा वापरही वाढला आहे. खानदेशात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. .सध्या पिकात तण वाढले असून, ते नष्ट करण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने तणनाशकांचा वापर वाढला आहे. गवत व तणामुळे पिकात रोगराईच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. पांढरी माशी आणि अन्य किडींचा प्रादुर्भावही दिसून येत आहे..Kharif Crop Survey: तालुका समित्यांनी वस्तुनिष्ठ पीक पाहणी अहवाल द्यावा : कीर्ती किरण पुजार.पाण्याची उपलब्धता लक्षात घेता बहुतांश बागायतदार शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी आणि सुरू हंगामातील उसाची लागवड केली आहे. शहादा तालुक्यात सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे..Farm Irrigation: पावसाच्या दडीमुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार.पिकात समस्याखानदेशात सर्वाधिक ऊस लागवड करणारा तालुका म्हणून शहादा तालुका पुढे आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे १६ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. शहादा तालुक्यात मध्यंतरी ऊस पीक जोमात येत होते. मात्र, अलीकडे रोगराई आणि अन्य समस्यांमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. म्हसावद, तोरखेडा या शहादा तालुक्यातील भागांत काही शेतकऱ्यांनी रोगराईमुळे ऊस पीक काढून टाकले आहे, अशी माहिती शेतकरी पुरुषोत्तम पटेल (म्हसावद, ता. शहादा) यांनी दिली. काही भागांत पिकाची वाढ चांगली झाली आहे..मात्र, आता पिकात तण वाढले आहे. तण काढण्यासाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने आंतरमशागतीची कामे रखडली आहेत. अनेक महिला आणि ग्रामस्थ लाडकी बहीण योजनेच्या अर्जांसाठी आठ ते दहा दिवस तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अर्जाची कार्यवाही करीत होते. त्यामुळे या काळात तण काढण्यासह अन्य शेतीकामे रखडली. सध्या पाऊस नसल्याने ही कामे बऱ्यापैकी गतीने सुरू आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.