Vaijapur Gangapur Farmers Demand Canal Water: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकरी आज (दि. ३१ ऑक्टोबर) समृद्धी महामार्गावर उतरले. यात महिला शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे. नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडावे, अशी त्यांची मागणी आहे. याबाबत वारंवार मागणी करुनसुद्धा जलसंपदा विभाग दखल घेत नाही, असे सांगत त्यांनी समृद्धी महामार्गावर ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले. .जोपर्यंत नांदूर मधमेश्वर कालव्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही; तोपर्यंत महामार्गावरुन हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. गंगापूर आणि वैजापूर तालुक्याचे हक्काचे १० टीएमसी पाणी आहे. त्या पाण्यासाठी आमचे आठवडाभरापासून आंदोलन सुरु आहे. त्याची जलसपंदा विभागाने दखल घेतलेली नाही. यामुळे आम्हाला समृद्धी महामार्गावर उतरावे लागले, अशी भावना एका शेतकरी महिलेने व्यक्त केली..Farmers Protest: चार दिवसांच्या आत पाणी सोडा अन्यथा...; कोरड्या कृष्णा नदीपात्रात राजू शेट्टींच्या नेतृत्त्वात शेतकऱ्यांचा ठिय्या .आम्ही याआधीही ५ ऑक्टोबरला नांदूर मधमेश्वर कार्यालयावर आक्रोश मोर्चा केला. तिथेही आमच्या मागण्या फेटाळून लावल्या. सिंचनासाठी पाणी मिळणार नाही, असे सांगण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कालव्यातून पाणी सोडले जात असताना मराठवाड्यातील नांदूर मधमेश्वर लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय का? रब्बी हंगामात तीन आवर्तने सोडावीत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले..Samruddhi Mahamarg Protest: समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न, पोलिस- आंदोलकांमध्ये झटापट, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाच्या मदतीची मागणी.समृद्धी महामार्गावर आंदोलन करु नका, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी पोलिसांनी केले. पण शेतकरी पोलीस प्रशासनाचा विरोध झुगारत मोठ्या संख्येने थेट समृद्धी महामार्गावर उतरले. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. तसेच महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. .उजनीतील डेटा सेंटर विरोधात आंदोलनसोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील प्रस्तावित एआय डेटा सेंटरला विरोध सुरु आहे. यावरुन आज आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे-सोलापूर महामार्गावरील उजनी पुलाजवळील रांजणी चौकात आंदोलन करण्यात आले. या प्रकल्पाचा शेतकरी आणि मच्छीमारांच्या हितावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक मच्छिमार, शेतकरी यांचा विरोध डावलून डाटा सेंटर, सोलार, हायड्रोजन प्रकल्पासह इतर प्रकल्पांच्या माध्यमातून उजनी धरणच गिळंकृत करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी दिला आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.