Banana Export: नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केळी आणि हळदीचे महत्त्व लक्षात घेऊन बारड येथे स्थापन झालेल्या शितलादेवी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीने निर्यातक्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. देशांतर्गत बाजारातील अस्थिर दरांना पर्याय म्हणून आखाती देशांत निर्यात सुरू करत कंपनीने केवळ दोन वर्षांत तब्बल आठ कोटींची उलाढाल केली आहे.