El Nino Impact: एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली मृद व जलसंधारण विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या एकूण ३७९ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी १७७ कामे पूर्ण झाली तर २०२ कामे सध्या प्रगतीपथावर आहेत..नांदेड जिल्ह्यात जलसंधारण कामात आतापर्यंत एक लाख ७८ हजार ६६८ मीटर खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. आणखी ८६ हजार ५८३ मीटर खोलीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. .Doddnala Water Project: दोड्डनाला प्रकल्प ‘म्हैसाळ’च्या पाण्याने भरा.या कामांमुळे पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचून होणारे नुकसान कमी होणार असून भूजल पातळीत वाढ होण्यास मदत मिळणार आहे. परिणामी पाणीटंचाई निवारण, सिंचन सुविधा आणि शेती उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे. याशिवाय, जलसंधारण कामांच्या परिसरात एक लाख बांबू लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बांबू लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे..Water Scarcity: माहूरचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार.कमी खर्चात अधिक उत्पादन मिळत असल्याने शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत सन २०२५-२६ मध्ये आतापर्यंत ५४ तलावांमधून गाळ काढण्यात आला आहे. ५८४ शेतकर्यांनी ९ लाख ६३ हजार २४३ घनमीटर गाळ शेतात टाकला आहे. .त्यामुळे संबंधित भागातील पीकपद्धतीत बदल होऊन गहू, हळद आणि कापूस यांसारख्या नगदी पिकांकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे. यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन रोजगारासाठी होणारे स्थलांतरही कमी होण्यास मदत होत आहे. वर्ष २०२६-२७ साठी या अभियानांतर्गत २८ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यातून अंदाजे ८ लाख ५८ हजार १३५ घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा लाभ ४८८ शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती जलसंधारण विभागाने दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.