Crop Protection: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना (मृग बहर) २०२६-२७ अंतर्गत हळद पिकासाठी राज्यात सर्वाधिक विमा नोंदणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे. राज्यातील एकूण ४१ हजार ५९५ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला असून, त्यापैकी १३ हजार ९०३ शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे हळद उत्पादनाबरोबरच विमा संरक्षणातही नांदेडने राज्यात आघाडी घेतली आहे..नांदेडनंतर परभणी जिल्ह्यात १२ हजार १६२, हिंगोलीमध्ये ११ हजार ९१० आणि अहिल्यानगरमध्ये ११ हजार ३५ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. हवामानातील वाढती अनिश्चितता, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा हळद पिकावर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी विमा संरक्षणाला प्राधान्य दिल्याचे दिसून येते..Turmeric Crop Insurance: हळदीचा फळपीक विम्यात समावेश.नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. त्यामध्ये हदगाव तालुका २,७१६ नोंदण्यांसह प्रथम क्रमांकावर असून, त्यानंतर लोहा (२,६६९), अर्धापूर (२,०६६), हिमायतनगर (१,४९५), नांदेड (९०६), मुखेड (८१६), कंधार (८०१) आणि भोकर (५८१) या तालुक्यांचा क्रमांक लागतो. बिलोली, देगलूर, धर्माबाद, माहूर आणि किनवट या तालुक्यांत तुलनेने कमी नोंदणी झाली आहे..Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय.जिल्ह्यात १३ हजार ९०३ अर्ज प्राप्त झाले असून, त्यामध्ये ४१ कर्जदार आणि १३ हजार ८६२ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेत ७,००५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ६.२७ कोटी रुपये, तर राज्य आणि केंद्र शासनाने प्रत्येकी १.२५ कोटी रुपये असा एकूण ८.७८ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. या माध्यमातून १२५.५६ कोटी रुपयांचे विमा संरक्षण हळद उत्पादकांना मिळाले आहे..जागरूकतेचा परिणामहवामान बदलामुळे हळद पिकाच्या उत्पादन आणि गुणवत्तेसंदर्भातील धोका वाढत असताना विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढलेली जागरूकता ही सकारात्मक बाब मानली जात आहे. कृषी विभागाच्या जनजागृती मोहिमा, स्थानिक स्तरावरील मार्गदर्शन आणि विमा संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्याच्या प्रयत्नांमुळे नांदेड जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक नोंदणी झाल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.