Nanded Rainfall: नांदेडला पाच महिन्यांत विक्रमी १३७ टक्के पाऊस
Excess Rainfall: नांदेड जिल्ह्यात यंदा पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून पाच महिन्यांत वार्षिक सरासरीपेक्षा १३६ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. सर्व १६ तालुक्यांनी आपापली सरासरी ओलांडली असून लोहा तालुक्यात सर्वाधिक १६६ टक्के पावसाची नोंद झाली आहे.