Dry Fodder Rain Damage: नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. ७) दुपारनंतर अनेक भागांत मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. हदगाव तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला, तर लोहा तालुक्यासह इतर भागांतही मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या पावसामुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली..गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला होता. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले होते. .Pre Monsoon Rain Impact: सिंधुदुर्गला पूर्वमोसमी पावसाचा दणका.अशात गुरुवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी विजांचाही कडकडाट झाला..Pre Monsoon Rain Impact: पूर्वमोसमीच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती कायम.हदगाव तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतातील कामांवर परिणाम झाला. अनेक शेतकऱ्यांनी उन्हात वाळविण्यासाठी किंवा प्रक्रियेसाठी वाढवून ठेवलेली हळद पावसात भिजली. त्यामुळे हळद उत्पादकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. .तसेच शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेले वैरणही अनेक ठिकाणी भिजून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे वैरण सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू होती. दरम्यान, या मॉन्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाली आहे. हवामानातील बदलामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.