Nanded News: नांदेड जिल्ह्यात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा व दिलेली उद्दिष्टे विहित वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, अशा सूचना प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेच्या केंद्रीय नोडल अधिकारी तथा भारत सरकार राजभाषा विभागाच्या संयुक्त सचिव डॉ. निधी पांडे यांनी दिल्या. .जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २४) कृषी विभागाशी संलग्न विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत,.PM Kisan Samman Nidhi: महिनाभरापासून संकेतस्थळ बंद असल्याने ‘सन्मान निधी’ पासून लाभार्थी वंचित .कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, पोखर्णी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, कृषी उपसंचालक केलास वानखेडे, प्रकल्प उपसंचालक (आत्मा) अर्चना गुंजकर, उपविभागीय कृषी अधिकारी अनिल शिरफुले, मृद् व जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, रेशीम विभागाच्या तंत्र अधिकारी कांचन जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत .डॉ. पांडे म्हणाल्या की, जिल्ह्यासाठी कृषी विभागाने तयार केलेल्या जिल्हा आराखड्यात आवश्यक त्या सुधारणा करून उद्दिष्टपूर्ती वेळेत करावी. तसेच यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या यंत्रसामुग्रीबाबत त्यांचा अभिप्राय व अडचणी जाणून घ्याव्यात. .शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून व्हॉट्सऍप गटांच्या माध्यमातून समन्वय साधावा व त्यांच्या समस्या तत्काळ सोडवाव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबत जिल्हा उपनिबंधक, ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा उद्योग केंद्र, फार्मर कप, सिंचन, जिल्हा जलसंधारण विभाग, नाबार्ड, कापूस संशोधन केंद्र, अग्रणी बँक आदी विभागांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.