Nanded News : जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून मदतीची रक्कम जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली मदतीची रक्कम बँकांनी कर्ज खात्यात अथवा इतर वसुलीसाठी वळती करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा अग्रणी बँक व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना दिले आहेत. .नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट २०२५ मध्ये अतिवृष्टी व पुर यामुळे ७ लाख ७४ हजार ३१३ शेतकऱ्यांचे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाचे अहवालावरून शासनाने एकूण ५५३.३४ कोटी रुपये मदत निधी जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मंजूर केला आहे. .Flood Relief : सिद्धेश्वर बाजार समिती पूरग्रस्तांना ५१ लाखांची मदत.ही मंजूर रक्कम बाधित शेतकऱ्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे वाटप करण्यात येत आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील चार लाख ८२ हजार ६७४ शेतकऱ्यांना ३६२.०३ कोटी इतक्या रकमेचे वाटप करण्यासाठीची माहिती ऑनलाइन प्रणालीवर संबंधित तहसील कार्यालयातून भरण्यात आली आहे..Farmers Flood Relief: पूरग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी ‘स्नेहवन’ सरसावले .उर्वरित शेतकरी यांची माहिती संगणकीय प्रणालीवर भरण्याची कार्यवाही सुरु आहे. माहिती भरण्यात आलेल्या शेतकऱ्यांचे वि.के. नंबर त्या गावच्या तलाठी यांच्यामार्फत गावात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या वि.के. नंबरद्वारे सेतू सुविधा केंद्रावर जाऊन ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदतीची रक्कम डीबीटी पद्धतीने शासनामार्फत जमा होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिली आहे..मुख्य मुद्देअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची संख्या: ७,७४,३१३नुकसान क्षेत्रफळ: ६,४८,५३३.२१ हेक्टरमंजूर मदत निधी: ५५३.३४ कोटी रुपयेआतापर्यंत मदत प्राप्त शेतकऱ्यांची संख्या: ४,८२,६७४आतापर्यंत वाटप केलेली रक्कम: ३६२.०३ कोटी रुपये .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.