कृष्णा जोमेगावकर Maharashtra Weather : नांदेड जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने होत आले, तरी सर्वदूर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात अपेक्षित ५९९.१० मिलिमीटरच्या तुलनेत प्रत्यक्ष ५०८.७० मिलिमीटर पाऊस झाला असून, अपेक्षेच्या तुलनेत सुमारे ९०.४० मिलिमीटर पावसाची तूट आहे. आजअखेर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या केवळ ५७.५८ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांसह आगामी रब्बी हंगामासाठीही शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे..जिल्ह्यात आजअखेर सर्वाधिक पाऊस किनवट येथे ६९१.३०, माहूर ६८३.४० आणि मुदखेड येथे ६४०.३० मिलिमीटर झाला आहे. त्याखालोखाल भोकर येथे ४८५.५०, लोहा ४६८.४०, नांदेड ४७६.०० आणि धर्माबाद येथे ४७१.८० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नायगावमध्ये सर्वांत कमी ४०८.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत ३१ ऑक्टोबरपर्यंत अपेक्षित पावसाच्या तुलनेत तूट कायम आहे..Sangli Rain: सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत १०९ टक्के पाऊस.दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांत पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या असल्या, तरी जोरदार आणि सलग पावसाचा अभाव आहे. २५ ऑगस्टला जिल्ह्यात सरासरी केवळ ४.५० मिलिमीटर पाऊस झाला. लोहा येथे सर्वाधिक १६ मिलिमीटर, नांदेड १२.९०, मुदखेड १२.३०, भोकर १०.५० आणि अर्धापूर येथे ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हदगाव व माहूरमध्ये पाऊस झाला नाही..Marathwada Heavy Rain: पावसाने मराठवाडा ‘चिंब’.प्रकल्पांमध्येही मर्यादित साठाजोरदार पाऊस न झाल्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यावरही दिसून येत आहे. १६ जुलैच्या नांदेड पाटबंधारे मंडळाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील १०४ मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ७२७.३६ दशलक्ष घनमीटर असून, प्रत्यक्ष उपयुक्त साठा केवळ २३१.२० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३१.७९ टक्के होता. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याची उपलब्धता आव्हानात्मक ठरू शकते..पिकांना पावसाची गरजपावसातील खंडामुळे काही भागांत खरीप पिकांना पाण्याचा ताण जाणवत आहे. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांसाठी पुढील काळातील पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. पावसाने दीर्घ खंड दिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी काही दिवसांत होणाऱ्या पावसाकडे लागले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.