Nanded News: नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विशेषतः किनवट, माहूर, नायगाव, धर्माबाद, बिलोली, मुखेड, कंधार व लोहा या तालुक्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह सरी कोसळल्याने रब्बी पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे. .वादळी वाऱ्यामुळे शेतातील गहू व ज्वारी पिके आडवी पडली असून, काढणीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांना फटका बसला आहे. गव्हाचे दाणे भरत असताना पिके जमिनीवर आडवी पडल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. .Cloudy Weather : काही दिवसांपासून ढगाळ वातावरण.ज्वारीच्या कणसांनाही पावसाचा व वाऱ्याचा फटका बसला आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याची काढणी करून सुड्या शेतातच ठेवल्या होत्या. अचानक झालेल्या पावसामुळे या सुड्या भिजून दाण्यांची गुणवत्ता घसरली आहे. काही ठिकाणी हरभऱ्याला कोंब फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. .Cloudy Weather: ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार शक्य.त्यामुळे बाजारभावात घट येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील विविध भागांत ढगाळ वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पुढील काही दिवस हवामान स्वच्छ झाले नाही, तर उभ्या पिकांबरोबरच काढणी केलेल्या पिकांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. .अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. महसूल व कृषी विभागाने त्वरित शेतपातळीवर पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला असून, भिजलेल्या हरभऱ्याच्या सूड्या उन्हात वाळवण्याचे आवाहन केले आहे. हवामानातील बदलत्या परिस्थितीमुळे रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.