Mumbai News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आठ लाख ५१ हजार ११० हेक्टर जमिनीवरील पिकांना तडाखा बसला आहे. यामध्ये नांदेड आणि वाशीम जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुरामुळे बाधित क्षत्रावरील पिकांचे पंचनामे रखडले आहेत..बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, सोलापूर, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नाशिक या जिल्ह्यांतील ७८ तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, ऊस, कांदा, हळद, भाजीपाला आणि फळपिके जमीनदोस्त झाली असून शेतामध्ये पाणी तुंबल्याने पंचनाम्यांमध्येही अडथळे येत आहेत..Nanded Heavy Rain: मुखेडला पाच नागरिकांसह ५२ जनांवरांचा मृत्यू.कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नांदेडमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अमरावती, नागपूर आणि अन्य भागांमध्ये संत्रा बागांना फटका बसला. नांदेड जिल्ह्यातील कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर, उमरी या तालुक्यांमध्ये मूग, सोयाबीन, उडीद, मका, ज्वारी आणि फळ पिकांचे अंदाजे दोन लाख ८५ हजार ५४३ हेक्टरवर नुकसान झाले आहे..वाशीम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर आणि मानोरा तालुक्यातील एक लाख ६४ हजार ५५७ हेक्टर वरील पिके बाधित झाली आहेत, तर वाशीम, हिंगोली आणि मानोरा तालुक्यांत २४६ हेक्टर जमीन खरडून गेली आहे..Maharashtra Heavy Rain: पीक नुकसानीसह चिंताही वाढली.पंचनामे करून तातडीने अहवाल द्या : अजित पवारअतिवृष्टीमुळे पिके घरांची हानी किंवा अन्य प्रकारच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवावेत, असे निर्देश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. २०) मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. पवार यांनी मंत्रालयात राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यांची माहिती घेतली..एका दिवसात दहा जणांचा मृत्यू१९ ऑगस्ट रोजी राज्यभरामध्ये दरड कोसळून तसेच पुरात वाहून गेल्याने आणि अन्य घटनांमध्ये दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये झाड पडल्याने एक जणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाले. नांदेडमध्ये पुरात वाहून गेल्याने चार जणांचा, मुंबई शहरामध्ये भिंत पडल्याने सिंधुदुर्गमध्ये पाण्यात बुडून दोघांचा, तर रायगडमध्ये दरड कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे ५२ पशुधनांचा मृत्यू झाला आहे. मात्र हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. राज्यात एनडीआरएफची १८, तर एसडीआरएफची सहा पथके तैनात करण्यात आली आहेत..अतिवृष्टी प्राथमिक अंदाजानुसार बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)नांदेड : २,८५५४३वाशीम : १, ६४, ५५७यवतमाळ : ८०, ९६९बुलडाणा: ७४,४०५अकोला : ४३,७०३सोलापूर: ४१,४७२हिंगोली : ४०,०००.धाराशिव : २८,५००परभणी : २०,२२५अमरावती : १२,६५२जळगाव : १२,३२७जालना : ५१७८नाशिक : ४०३५छ. संभाजीनगर : २०७४बीड : १९२५वर्धा : ७७३लातूर : १०अहिल्यानगर : ३एकूण : ८ लाख ५१ हजार ११०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.