Naldurg News: नळदुर्ग नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदार प्रक्रिया पार पडणार आहे. त्या दृष्टीने दहा प्रभागांसाठी प्रत्येकी दोनप्रमाणे २० मतदान केंद्रे आहेत. शहरातील ठाकरेनगर, व्यंकटेशनगर, रामलीलानगर, रहीमनगर, भवानीनगर येथील नागरिकांच्या सोयीसाठी बालाघाट महाविद्यालय व अध्यापक विद्यालय येथे नव्याने मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. .तर नगरपालिका येथील मतदान केंद्र कमी करून हुतात्मा स्मारकातील व्यायामशाळेत मतदान केंद्र बनविण्यात आले आहे. इंदिरानगर येथील प्रभाग दोन साठीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर सर्वाधिक १०१४, तर प्रभाग क्र.३ साठी माउलीनगर येथील प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक एक येथे सर्वात कमी ६४५ मतदार आहेत..Local Body Elections : उमेदवारी अर्जवाटपाची सर्वच पक्षांत लगीनघाई.शहरात १७ हजार १२० मतदाते मतदान करणार आहेत. मतदान केंद्रनिहाय मतदानाची माहिती पुढीलप्रमाणे ः प्रभाग एकसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर उत्तर बाजू खोली क्र. १ व खोली क्र. २ येथे प्रत्येकी ८३४ मतदार आहेत. प्रभाग क्र. दोनसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोली क्र.१ व २ मध्ये अनुक्रमे १०१४ व ९९७ मतदार, प्रभाग क्र. तीनसाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खोली क्र. १ व २ मध्ये अनुक्रमे ६४५ व ६४६ मतदार आहे..Local Body Elections: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा नगर परिषद, एका नगरपंचायतसाठी होणार निवडणूक .प्रभाग क्र. चारसाठी धरित्री विद्यालय उत्तर बाजू खोली क्र.१ व २ मध्ये प्रत्येकी ६९९ मतदार आहे. प्रभाग क्र. पाचसाठी मराठा गल्ली सभागृह या ठिकाणी ८९७ मतदार तर दुसरे केंद्र व्यायामशाळेत ८९४ मतदार आहेत. प्रभाग क्र.०६ साठी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा केंद्रावर ९७४ मतदार व जिल्हा परिषद प्राथमिक कन्या उर्दू शाळा प्राथमिक आरोग्य केंद्रा समोर १००० मतदार आहेत..प्रभाग क्र. सातसाठी हुतात्मा स्मारक हॉल येथे ९२७ मतदार तर येथीलच व्यायाम शाळा येथे ९२८ मतदार आहेत. प्रभाग क्र. आठमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक विशेष शाळा भीम नगर दक्षिण बाजू खोली क्र.१ येथे ७३३ मतदार, तर जिल्हा परिषद कन्या प्रशाला (बौद्धनगर) वर्ग ०५ या ठिकाणी ७७४ मतदार आहेत. प्रभाग क्र. नऊमध्ये स्वामी विवेकानंद अध्यापक विद्यालय (डीएड कॉलेज) संगणक खोली क्र. ३ या ठिकाणी ८८१ मतदार आहेत तर बालाघाट शिक्षण संस्था हॉल नंबर ५७ येथे ८३१ मतदार आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.