Latur/Dharashiv News: नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला व औसा येथील भुईकोट किल्याचे रुपडे आता पालटणार आहे. ऐतिहासिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने सरकारने या दोन्ही किल्ल्यांच्या जतन व संवर्धनासाठी निधी मंजूर केला आहे. यात नळदुर्ग किल्ल्यासाठी चौदा कोटी तर औशाच्या भुईकोट किल्ल्यासाठी ११ कोटी वीस लाखाचा निधी मंजूर झाला आहे. .राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना समजल्या जाणाऱ्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन, संवर्धन व मूळ स्वरूपात दुरुस्ती करण्यासाठी सुमारे १० कोटी ८७ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला. .Fort Conservation: राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करणार.असून जिल्हा नियोजन समितीकडून चार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले..Fort Development Funds: गड-किल्ल्यांच्या विकासासाठी निधी द्यावा.लातूर जिल्ह्यातील औसा भुईकोट किल्ल्याच्या जतन व दुरुस्ती कामासाठी ११ कोटी २० लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. .या निर्णयामुळे औसा शहराच्या पर्यटन विकासाला नवी चालना मिळणार असून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीलाही मोठा हातभार लागणार असल्याचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.