Livestock Injury Fire: येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील महिला दुग्ध उत्पादक शेतकरी रंजनाबाई दत्तू सदगीर यांच्या साठवून ठेवलेल्या चाऱ्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे ३० ते ३५ ट्रॉली चारा जळून खाक झाला असून,शेजारील गोठ्याला झळ पोहोचल्याने जनावरेही भाजली आहेत..सदगीर कुटुंब लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असताना घरात लहान मुले खेळत होती.अचानक बाहेर आगीचा मोठा लोळ दिसल्याने मुलांनी आरडाओरडा केला.स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत टँकर आणि बादल्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला,मात्र आगीचे स्वरूप रौद्र असल्याने नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.सरपंच सुनील साळवे यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले..Animal Fodder Fire: जनावरांचा चारा जळाल्याने शेतकरी हतबल.चाऱ्यासह शेणखत व शेतीसाहित्याचे नुकसानरंजनाबाई यांना तीन मुले असून तिघेही पशुपालन करतात. त्यांनी त्यांनी संभाव्य चाराटंचाई विचारता घेऊन उन्हाळ्याची सोय म्हणून बाहेरून चारा विकत घेतला होता.यासह चाऱ्याची कुट्टी करून ठेवलेली होती. मात्र भीषण आगीत चाऱ्यासोबतच वाळलेले शेणखत आणि शेतीचे पाईपही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे जनावरांच्या शेडचे नुकसान झाले असून काही गायी, शेळ्या आणि बैल भाजले गेले आहेत.सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाली नाही;परंतु लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. चारा जळाला असून आगामी काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे त्यांच्यासमोर आव्हान आहे..Orchard Fire Crisis: कांदळगावला १६ एकरांवरील आंबा, काजू बागा जळून खाक.उन्हाळ्यासाठी मोठ्या कष्टाने ४० ते ४५ ट्रॉली चारा जमा केला होता. घरी नसताना ही दुर्घटना घडली. चाऱ्यासह यात २२ ट्रॉली खत आणि २५ पाईप जळून खाक झाले असून साधारण २ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. २५-३० दुभती जनावरे आहेत,त्यांच्यासाठी आता चाराच शिल्लक राहिलेला नाही. सरकारने भरपाई द्यावी.- रंजनाबाई सदगीर,बाधित शेतकरी..घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि तहसील कार्यालयाला सूचित केले.सदगीर कुटुंबाचे या आगीत प्रचंड नुकसान झाले आहे.प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला योग्य भरपाई मिळवून द्यावी.”- सुनील साळवे,सरपंच,नायगव्हाण.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.