Fish farming Problems in Nagpur: नागपूर जिल्ह्यातील मत्स्यपालनासाठी महत्त्वाच्या पेंच आणि खिंडसी येथील शासकीय हॅचेरी गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने मत्स्यबीज उत्पादनावर परिणाम झाला आहे. दर वर्षी सुमारे तीन कोटी मत्स्यजिऱ्यांची मागणी असताना शासकीय यंत्रणेची उत्पादन व्यवस्था ठप्प असल्याने मत्स्यपालकांना खासगी हॅचेरीकडे वळावे लागत आहे. .महागडे मत्स्यबीज आणि वेळेवर उपलब्धतेचा अभाव यामुळे मत्स्यपालनाचा खर्च वाढत असून, त्याचा थेट फटका मत्स्यपालकांना बसत आहे.जिल्ह्यात मत्स्यपालनासाठी दर वर्षी सुमारे तीन कोटी मत्स्यजिऱ्यांची मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी पेंच येथे शासकीय हॅचेरी, तर खिंडसी येथे रिअरिंग सेंटर उभारण्यात आले आहे..या दोन्ही प्रकल्पांमधून विविध प्रजातींचे मत्स्यबीज तयार करून शेततळी, जलाशय तसेच मत्स्य सहकारी संस्थांना पुरविले जाते. दोन्ही प्रकल्पांची जीरा ते बोटुकली उत्पादन क्षमता सुमारे ४६ लाख आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यपालकांसाठी या केंद्रांचे महत्त्व मोठे आहे..Shivnibandh Fish Seed Centre: ‘शिवनीबांध मत्स्यबीज’ची निविदा स्थगित.मात्र, गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही प्रकल्पांमधील उत्पादन पूर्णतः बंद आहे. तांत्रिक बिघाड, दुरुस्तीची कामे, मनुष्यबळाची कमतरता तसेच न्यायालयीन प्रकरण यामुळे हॅचेरी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. दोन वर्षांपूर्वी पेंच आणि खिंडसी या दोन्ही ठिकाणी निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. पेंच येथील व्यावसायिकाने निविदेतील काम परवडत नसल्याचे कारण देत काम सोडले. खिंडसी येथे निविदा मिळालेल्या संस्थेने प्रत्यक्ष काम न केल्याने तिचा ठेका रद्द करण्यात आला. त्यानंतर दोन्ही ठिकाणी मत्स्यबीज उत्पादनाची प्रक्रिया ठप्प झाली..Carp Fish Breeding: कार्प प्रजातीच्या माशांचे प्रेरित प्रजनन .शासकीय हॅचेरी सुरू असल्यास तुलनेने परवडणाऱ्या दरात मत्स्यबीज उपलब्ध होण्याबरोबरच विविध प्रजातींच्या मत्स्यबीजाचा नियोजित पुरवठा करणे शक्य होते. मात्र, दोन वर्षांपासून ही व्यवस्था बंद असल्याने खासगी उत्पादकांवरील अवलंबित्व वाढले आहे. परिणामी, मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याच्या शासनाच्या प्रयत्नांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे..विशेष म्हणजे, खिंडसी येथील हॅचेरीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील उत्पादन पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पेंच येथील निविदा न्यायालयीन प्रकरणामुळे रखडली आहे. हे प्रकरण निकाली निघाल्यानंतर पेंच हॅचेरीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया केली जाणार आहे..खासगी हॅचेरीवर वाढला भारशासकीय हॅचेरी बंद असल्याने मत्स्यपालकांना खासगी उत्पादकांकडून मत्स्यबीज खरेदी करावे लागत आहे. खासगी हॅचेरीतील मत्स्यबीज तुलनेने महाग असल्याने लहान आणि मध्यम मत्स्यपालकांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. शिवाय, मागणीच्या काळात आवश्यक प्रमाणात मत्स्यबीज उपलब्ध होईलच, याची खात्री नसल्याने मत्स्यपालनाचे नियोजनही अडचणीत येत आहे..खिंडसी येथील निविदा प्रक्रिया झालेली आहे. पेंच येथील निविदा न्यायालयीन प्रकरणामुळे अडकली आहे. काही दिवसांत प्रकरण निकाली निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया करण्यात येईल.शुभम कोमरेवार, सहायक आयुक्त, मत्स्य विभाग, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.