Infrastructure Project: उपराजधानी नागपूर येथील विधान भवन संकुलाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला गती मिळाली आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यानंतरचे हिवाळी अधिवेशन नव्या संकुलात होण्याची शक्यता आहे..विधिमंडळाच्या पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ समितीने ११ मार्च रोजी या प्रकल्पाला मंजुरी दिल्यानंतर अंमलबजावणीला वेग आला आहे. प्रसिद्ध वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी नव्या विधान भवनाचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. सध्याच्या ऐतिहासिक विधान भवनाला कोणताही धक्का न लावता संविधान चौकासमोरील जागेत सुमारे ५० मीटर उंचीची नवी इमारत उभारण्यात येणार आहे..Rural Regional Development: सोलापूर जिल्ह्यात आणखी एक आकांक्षित तालुका.नव्या संकुलात विधानसभा आणि विधान परिषदेची सभागृहे प्रथमच एकाच छताखाली असतील. इमारतीच्या खालच्या स्तरावर विधानसभा सभागृह, तर वरच्या स्तरावर विधान परिषद सभागृह आणि सेंट्रल हॉल उभारण्यात येणार आहे. याच इमारतीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांसाठी स्वतंत्र अत्याधुनिक दालनेही तयार करण्यात येणार आहेत..Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ.हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध शासकीय विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी वेगवेगळ्या इमारतींमध्ये कार्यरत असल्याने समन्वयात अडचणी येतात. ही गैरसोय दूर करण्यासाठी सात मजली स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून, सर्व वरिष्ठ अधिकारी एकाच परिसरात कार्यरत राहतील. .त्यामुळे निर्णयप्रक्रिया आणि प्रशासकीय समन्वय अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.विधान भवनाच्या विस्तारीकरणासाठी शासकीय मुद्रणालयाची जागा उपलब्ध झाली असून, मुख्य संकुल आणि नव्या इमारतींना जोडण्यासाठी भुयारी मार्ग उभारण्यात येणार आहे. तसेच २५० हून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.