Nagpur News : सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील खाद्यपदार्थांवर अन्न व औषधी प्रशासनाकडून लक्ष दिले जात आहे. त्या अंतर्गत भेसळीच्या संशयावरून गत काही दिवसांत केलेल्या कारवाईत ३६ लाख रुपये किमतीचे २९ हजार किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. मात्र कारवाईसाठी अहवालाची प्रतीक्षा आहे. .जन्माष्टमीपासून हिंदू सणांना सुरुवात होते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आदी सण होऊन गेले तर दिवाळी सण तोंडावर आहे. अशात अन्नपदार्थाची बाजारात मागणी अधिक आणि पुरवठा कमी होत असल्याने जास्त नफा मिळविण्यासाठी व्यावसायिकांकडून दूध, मिठाई, तूप, पनीर, दही, खाद्यतेल, रवा, आटा, बेसन, सुकामेवा आदींमध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याचे अन्न औषधी विभागाच्या वतीने केलेल्या कारवाईतून दिसून आले आहे..Edible Oil Adulteration: खाद्यतेल भेसळप्रकरणी दोन अधिकारी निलंबित.अन्न व औषध प्रशासन विभागाने नागपूर विभागात ‘सण महाराष्ट्राचा संकल्प अन्नसुरक्षिततेचा’ या अभियानाअंतर्गत विशेष तपासणी मोहीम राबवली. ही मोहीम ११ ऑगस्ट पासून सुरू आहे. त्या अंतर्गत भेसळीच्या संशयावरून २९ हजार ५५२ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. .ज्याची किंमत ३६ लाख ३ हजार ७६६ रुपये असल्याचे सांगण्यात आली आहे. हे सर्व नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. मात्र यातील बहुतेक नमुन्यांचा अहवाल प्राप्त न झाल्यामुळे कारवाई थंड बस्त्यात पडली आहे..Food Adulteration : रायगडमध्ये भेसळखोरांना बसणार लगाम .२९७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबितएकूण ४८५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. यामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थांचे १३५, मिठाईचे ७६, रवा-मैदा-आटा-बेसनाचे १५७, खाद्यतेलाचे ६७ आणि इतर अन्नपदार्थांचे ५० नमुने घेण्यात आले आहेत. त्यापैकी १७८ नमुने प्रमाणित दर्जाचे, १० नमुने कमी दर्जाचे, तर २९७ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत..जप्त करण्यात आलेले अन्नपदार्थदूध व दुग्धजन्य पदार्थ ८०४३.२ किलोमिठाई ३०५७.५ किलोरवा, आटा, बेसन १९१५ किलोखाद्यतेल ४९२०.६ किलोइतर अन्नपदार्थ ११६१५.७ किलो.सणासुदीच्या काळात मिठाई, दूध, तेल, आणि दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना एफ.एस.एस.ए.आय.. परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खरेदी करावी, प्रशासनाकडून पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे. - के. आर. जयपुरकर, सहआयुक्त (अन्न) नागपूर विभाग.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.