Crop Insurance Scheme: पीकांना संरक्षण मिळावे यासाठी गत वर्षी मोठा प्रीमियम भरून विभागातील तब्बल ४ लाख २१ हजार शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. एक हंगाम संपून दुसरा हंगाम तोंडावर आला मात्र अद्याप भरपाईबाबत निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे..गत वर्षात ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. विशेषतः सप्टेंबर महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे पूर्व विदर्भात ३ लाख ४४ हजार ६२९ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. सोयाबीन, कापूस आणि तुरीसारख्या प्रमुख पिकांना याचा मोठा फटका बसला होता. .Crop Insurance Compensation Issues: नुकसान जास्त होऊनही विमा भरपाई तुटपुंजी.या नुकसानीचा प्राथमिक अहवाल, अंतिम अहवाल तसेच पीक कापणी प्रयोगाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली. मात्र ही औपचारिकता होऊनही महिने उलटले तरी अद्याप विम्याची भरपाई मिळाली नाही. याबाबत अद्यापही स्पष्टत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे..Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?.३.१५ लाख हेक्टरवरील पिकाचा विमापूर्व विदर्भात १ लाख ६१ हजार ९५५ कर्जदार शेतकरी आणि २ लाख ५९ हजार ९४८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा असा ४ लाख २१ हजार ९०३ शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यात सर्व शेतकऱ्यांनी मिळून सुमारे ३ लाख १५ हजार १८.२२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांसाठी विमा संरक्षण घेतले होते..भरपाईसाठी ५०:५० चा फोर्म्यूलाझालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी कंपन्यांकडून ५०ः ५० या सूत्राप्रमाणे भरपाई देणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. यात ५० टक्के पीक कापणी प्रयोग तर ५० टक्के सॅटेलाइट आणि आयडियोटाइप व इतर तांत्रिक निकषाप्रमाणे देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र ती भरपाई किती असणार हे स्पष्ट करण्यात आले नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.