Farmer Participation: नागपूर पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळाल्याने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. खरीप २०२६ मध्ये आतापर्यंत २ लाख ४७ हजार २९५ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतला असून, गतवर्षीच्या तुलनेत १५ हजार ९२३ शेतकऱ्यांची भर पडली आहे..पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांतून ३ लाख ७६ हजार ४६६ हेक्टर क्षेत्र पीकविमा संरक्षणाखाली आले आहे. मंगळवार (ता. ४) पर्यंतची ही आकडेवारी आहे. यंदा सहभागी शेतकऱ्यांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत ६.८८ टक्के वाढ झाली आहे..Crop Insurance Registration: शेवटच्या मुदतीत पीकविम्यासाठी धावपळ.कृषी विभागाकडे पूर्व विदर्भातील १४ लाख ८३ हजार ६४५ शेतकरी खातेदारांची नोंद आहे. यापैकी ४ लाख ९३ हजार ११३ विमा अर्ज दाखल झाले आहेत. यात १ लाख २० हजार ७५४ कर्जदार, तर ३ लाख ७२ हजार ३५९ बिगरकर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. यासाठी २ हजार २८२ कोटी ६९ लाख रुपयांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे अदा करण्यात आला आहे. पीकविमा योजनेच्या सहभागासाठी आता २ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसातील खंड, कीड व रोगांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळत असल्याने शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीकविमा उतरवावा, असे आवाहन विभागीय कृषी विभागाने केले आहे..Kharif Crop Insurance: खरीप पीकविमा योजनेला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ; कृषिमंत्री भरणे : वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन.गोंदिया, वर्धेत मोठी वाढपीकविमा सहभागाच्या वाढीत गोंदिया आणि वर्धा जिल्हे आघाडीवर आहेत. गतवर्षीच्या तुलनेत गोंदियात २५२.०२ टक्के, तर वर्धा जिल्ह्यात २३५.८६ टक्के वाढ झाली आहे. नागपूरमध्ये ८७.७८ टक्के, भंडारा ७८.६८ टक्के आणि गडचिरोलीत ६३.०६ टक्के वाढ नोंदविण्यात आली. चंद्रपूरमध्ये मात्र ३५.४० टक्के वाढ झाली आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत चंद्रपूरमध्ये पीकविम्याचा हप्ता अधिक असल्याने सहभाग अपेक्षेप्रमाणे वाढला नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले..गतवर्षीपेक्षा १५ हजार शेतकरी अधिकखरीप २०२५ मध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २ लाख ३१ हजार ३७२ शेतकऱ्यांनी पीकविमा घेतला होता. यंदा ही संख्या २ लाख ४७ हजार २९५ वर पोहोचली आहे. त्यामुळे एका वर्षात १५ हजार ९२३ शेतकऱ्यांची वाढ झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.