Nagpur Chana Market: नागपूर जिल्ह्यात बारदान्याच्या तुटवड्यामुळे हमीभाव हरभरा खरेदी प्रक्रिया अडचणीत आली आहे. पणन महासंघाकडून खरेदी केंद्रांना पुरेशा प्रमाणात बारदान्याचा पुरवठा न झाल्याने पुढील दोन-तीन दिवसांत खरेदी प्रक्रिया थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे..यंदा शासनाने हरभऱ्याला प्रति क्विंटल ५,८७५ रुपये हमीदर जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात पणन महासंघाच्या वतीने नऊ खरेदी केंद्रे उभारण्यात आली आहेत. खुल्या बाजारात ४,५०० ते ५,३०० रुपये दर हरभऱ्याला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हमीभाव केंद्रांकडेच अधिक कल आहे. त्यामुळे नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाली. मात्र खरेदीसाठी आवश्यक असलेल्या बारदान्याचा पुरवठा अपुरा पडत आहे..Chana Procurement Delay: शेतकऱ्यांची हरभरा खरेदीसाठी प्रतीक्षा.सध्या मागील हंगामात शिल्लक राहिलेल्या बारदान्याची खरेदी सुरू आहे. मंगळवारपर्यंत १७ हजार ४५४ क्विंटल हरभरा खरेदी झाली. हरभरा खरेदीला महिना पूर्ण होत नाही तोच बारदाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पुढील दोन दिवसांत नवीन साठा उपलब्ध न झाल्यास खरेदी केंद्रांवरील व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली..Chana Farmer Registration: हरभरा नोंदणीला शेतकऱ्यांचा अत्यल्प प्रतिसाद.अमरावती, चंद्रपूरला खरेदी ठप्पअमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांत बारदान्याअभावी पणन विभागाची हरभरा खरेदी ठप्प झाली आहे. हीच स्थिती नागपूर जिल्ह्यात या आठवड्याच्या अखेरीस निर्माण होण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी या हंगामात केवळ ६० हजार नग बारदाणा देण्यात आला होता. उसनवारीने बारदान्याचे नियोजन करून आतापर्यंत वेळ मारून नेण्यात आली. आता मात्र जिल्ह्यात खरेदी ठप्प होणार असल्याचे सांगण्यात आले..दोन दिवस पुरेल एवढाच बारदाना शिल्लक आहे. पणन महासंघाकडे १ लाख नग बारदान्याची मागणी केली आहे. तो वेळेत मिळेल, अशी अपेक्षा आहे.अजय बिसेन, जिल्हा पणन अधिकारी, नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.