Ahilyanagar News: राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगर पंचायतींच्या निवडणुकीत विजयी आणि पराभूत उमेदवारांमध्ये घराणेशाहीचाच बोलबाला असल्याचे समोर आले आहे. या निवडणुकीत ३३ ठिकाणी प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील नगराध्यक्ष झाले आहेत, तर २९ ठिकाणी मात्र राजकीय कुटुंबातील लोकांना मतदारांनी नाकारले आहे. .ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी नगरपालिकेतील राजकीय घराणेशाहीच्या केलेल्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष मांडले आहेत. त्यानुसार, एकूण ७० ठिकाणी नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार हे राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी व त्यांच्या नात्यातील होते. त्यातील एकूण उमेदवारांच्या जवळपास ६७ टक्के उमेदवार महायुतीचे आणि १७ टक्के उमेदवार महाविकास आघाडीशी संबंधित होते. त्यामुळे लोकसभा, विधानसभेनंतर नगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही घराणेशाहीच बळकट असल्याचे दिसून येत आहे..Nagarapalika Result: ऐन एकविशीतच गाठली नगराध्यक्षपदाला गवसणी.पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस व राष्ट्रवादी असे समीकरण होते, पण त्यातील बहुसंख्य नेते हे भाजपमध्ये गेल्याने आज भाजप हा घराणेशाही असलेला पक्ष ठरत आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीतून पुढे आलेल्या उमेदवारांची संख्या २८८ पैकी २३८ होती व ६१ मतदारसंघांत एकापेक्षा जास्त घराणेशाहीतून पुढे आलेले उमेदवार होते. यावेळी ३३ ठिकाणी राजकीय लोकांच्या कुटुंबातील नगराध्यक्ष झाले आहेत..Nagarapalika Result 2025: नगरपालिका निवडणुकीत मतदारांचा सत्ताधाऱ्यांना कौल.२९ ठिकाणी घराणेशाहीस नकार रत्नागिरी, गडहिंग्लज, मुरगूड, संगमनेर फलटण भुसावळ, पंढरपूर, देवळी (वर्धा), यवतमाळ, बार्शी, करमाळा, दर्यापूर, पारोळा, पेठ, वडगाव, आजरा, पाथरी, वाशिम, वाशिम, मूर्तिजापूर, अकोट, बुलढाणा, श्रीरामपूर, अंजनगाव, भंडारा, तुमसर, लोहा, बदलापूर आदी सुमारे २९ ठिकाणी राजकीय कुटुंबातील सदस्याला नगराध्यक्ष करण्याला मतदारांनी नकार दिला. .‘‘नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने ६७ टक्के, तर महाविकास आघाडीने १७ टक्के उमेदवार घराणेशाहीतील दिले होते. विधानसभा, लोकसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही राजकीय लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे.’’हेरंब कुलकर्णी, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते, अकोले (जि.अहिल्यानगर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.