Nagpur News: नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत मोठे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात निधीची उभारणी आव्हानात्मक ठरत आहे. एकूण १ हजार ९२७ कोटींच्या या प्रकल्पासाठी महानगरपालिकेला १५ टक्के म्हणजेच सुमारे ३०४ कोटींचा वाटा द्यायचा आहे. हा निधी उभारण्यासाठी मनपाने २०० कोटींचे बाँड निर्गमित करण्याची तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान ३ महिने लागण्याची शक्यता आहे..महत्त्वाकांक्षी नाग नदी प्रकल्पासाठी केंद्राकडून ६० टक्के म्हणजेच १ हजार ११५ कोटी, राज्य सरकारकडून २५ टक्के म्हणजेच ५०७ कोटींचा निधी मिळणार आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक वर्षात २९५.६४ कोटींची तरतूद केली होती. मात्र, २०२६-२७ साठी कोणतीही तरतूद नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे..River Linking Project: नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगावचा समावेश करावा.मनपाने आगामी अर्थसंकल्पात केवळ २०० कोटींची तरतूद केल्याचे समजते. दरम्यान, पोहरा नदी प्रकल्पासाठी मनपाने ४०० कोटींचे कर्ज उचलण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी वित्तीय संस्थांकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्यात आले आहे. ४ संस्थांनी यामध्ये रस दाखविला आहे. कर्ज उभारणीत अडथळा नसला, तरी महापालिकेवर वाढणारा कर्जाचा आर्थिक बोजा वाढणार आहे..River Linking Project: नदीजोड प्रकल्पाचे दमदार पाऊल.बाँडला थेट हमी नाही,मात्र सवलत मिळणारनाग नदी प्रकल्पासाठी जारी करण्यात येणाऱ्या २०० कोटी रुपयांच्या बाँडला शासनाची थेट हमी नसली, तरी भारत सरकारकडून १२ टक्के वित्तीय सवलत (बूस्टर) मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे मनपाला सुमारे २४ कोटींचा लाभ होणार आहे. बाँड निर्गमित करण्यापूर्वी मनपाला आपल्या आर्थिक स्थितीचे सखोल परीक्षण करावे लागणार असून, त्यासोबतच आवश्यक कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच बाँड बाजारात आणण्याचा मार्ग मोकळा होणार आहे..पोहरा नदी प्रकल्पाची वैशिष्ट्येपोहरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी एकूण ९५७.०१ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मनपाचा संयुक्त आर्थिक सहभाग आहे. प्रकल्पाच्या निधी वाटपात केंद्र व राज्य सरकारचा प्रत्येकी २५ टक्के, तर मनपाचा ५० टक्के हिस्सा निश्चित करण्यात आला आहे. .सांडपाणी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी शहरात ३६६ किलोमीटर लांबीचे सांडपाणी वाहून नेणारे नवीन जाळे उभारण्यात येणार आहे. तसेच, १७३ किलोमीटर लांबीच्या जुन्या वाहिन्याही पुनर्स्थापित करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पॅकेज-१ अंतर्गत ४५ एमएलडी क्षमतेचा एसटीपी उभारण्यात येणार आहे. विशेषतः हुडकेश्वर व नरसाळा परिसरावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, या भागांतील सांडपाणी थेट नदीत जाणे रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.