Yavatmal Farmers: केंद्र शासनाच्या आधारभूत हमीभाव योजनेअंतर्गत नाफेडमार्फत सुरू असलेली उन्हाळी ज्वारी खरेदी अचानक बंद झाल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. त्यातच खरेदीचे पोर्टल ही बंद असल्याने शेतकऱ्यांना ज्वारी खुल्या बाजारात विकावी लागत असून, हमीभाव ३,६९९ रुपये प्रति क्विंटल असताना प्रत्यक्ष बाजारात केवळ १,८०० ते २,००० रुपये दर मिळत आहे. .त्यामुळे प्रति क्विंटल सुमारे १,७०० रुपयांपर्यंतचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. महागाव तालुक्यात नाफेड खरेदीसाठी ४६५ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ १६२ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली असून, ३०३ नोंदणीकृत शेतकरी अद्यापही खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत..Onion Procurement Price: कांदा खरेदीचा सुधारित दर म्हणजे फुसका बार.गेल्या पाच दिवसांपासून खरेदी प्रक्रिया ठप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते मनीष जाधव यांनी नाफेडचे पोर्टल तातडीने सुरू करून सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी करण्याची मागणी केली आहे..NAFED Onion Procurement: कांदा खरेदीचा ‘वांदा’!.अन्यथा हमीभाव आणि बाजारभावातील फरकाची भरपाई (भावांतर) शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी हरभरा, सोयाबीन आणि ज्वारी खरेदीही अशाच पद्धतीने अचानक बंद झाल्याने नोंदणीकृत उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला..जाधव यांनी केंद्र व राज्य शासनावर शेतकरीविरोधी धोरणांचा आरोप करत यवतमाळसारख्या संकटग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली. यावेळी प्रेमराव सरगर (तालुकाध्यक्ष, पुसद), विकास राठोड (शेतकरी संघर्ष सेना, सचिव) यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.