Onion Procurement: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत ‘किंमत स्थिरीकरण निधी’अंतर्गत नाफेडकडून १ लाख टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘नाफेड’च्या दिल्ली कार्यालयाचे विशेष दक्षता अधिकारी अजय कुमार आणि नाशिक शाखेचे नवे शाखा व्यवस्थापक अंकित मदान यांनी पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष लिलाव पद्धतीची पाहणी केली..या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कांदा दराचा प्रश्न उपस्थित करत पारदर्शक खरेदीची अपेक्षा व्यक्त केली. दरातील घसरण थांबविण्यासह पारदर्शक व्यवहारासाठी ‘नाफेड’ने बाजार समितीमधूनच थेट कांदा खरेदी करावी, अशी मागणी पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली..NAFED Onion Procurement: ‘नाफेड’च्या कांदा खरेदी कारभारात ‘पुन्हा पाढे पंचावन्न’.कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा रोष कमी करण्यासाठी केंद्र शासनाने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली आहे. मात्र, उत्पादन खर्चाच्या तुलनेत हा दर अपुरा असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली..NAFED NCCF Onion Procurement: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीत वखार महामंडळाची ‘एन्ट्री’ .दौऱ्यादरम्यान नाफेडच्या अधिकाऱ्यांनी बाजार समितीतील कांद्याची आवक, मालाचा दर्जा आणि लिलाव प्रक्रियेचेथेट निरीक्षण केले. तसेच जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या..शेतकऱ्यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यानाफेडने केवळ ठराविक खरेदी केंद्रांपुरते मर्यादित न राहता बाजार समितीच्या मुख्य लिलाव प्रक्रियेत थेट सहभागी व्हावे.नाफेडने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करावी, त्यामुळे खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येऊन भ्रष्टाचाराला आळा बसेल.नाफेड थेट बाजारात उतरल्यास व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्यास मदत होऊन शेतकऱ्यांना स्पर्धात्मक भाव मिळू शकतील..बाजार आवारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दरातील घसरण रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी शासनाने बाजार समित्यांमध्येच थेट कांदा खरेदी सुरू करावी. शासकीय खरेदीमुळे बाजारात स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यास मदत होईल. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा करण्यात आला आहे.- आमदार दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.